एक्स्प्लोर
'शासन आपल्या दारी'! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 हजार 457 कोटी रुपयांच्या योजनांचे लाभ
'शासन आपल्या दारी' अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे आज (26 मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजनांचे उद्घाटन करण्यात आले.
'शासन आपल्या दारी'! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 हजार 457 कोटी रुपयांच्या योजनांचे लाभ
1/11

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या अभियानाद्वारे हजारो लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.
2/11

मुख्यमंत्री शिंदे कार्यक्रमाच्या स्थळी दाखल होताच उपस्थित नागरिकांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
3/11

यावेळी शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि आमदार रमेश बोरनारे हे देखील उपस्थित होते.
4/11

तसेच याठिकाणी भाजपचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यासह भाजपचे अनेक आमदार देखील उपस्थित होते.
5/11

तर 'शासन आपल्या दारी' हा राज्यातील युती सरकारचा क्रांतिकारी उपक्रम असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
6/11

आतापर्यंत नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अथवा दाखले मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात खेटे घालावे लागायचे, मात्र आता शासन लोकांपर्यंत थेट पोहोचून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत असल्याचे शिंदे म्हणाले.
7/11

यावेळी जिल्ह्यात 5 हजार 457 कोटी रुपयांच्या निधीच्या वस्तूंचे या उपक्रमाद्वारे वाटप करण्यात येणार आहे. ऑफलाईन सहीत ऑनलाइन पध्दतीने देखील अनेक योजनांमधील लाभार्थ्यांना त्यांचे लाभ मिळवून देण्यात येत असल्याचे शिंदे म्हणाले.
8/11

राज्यातील प्रत्येक नागरिक हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. मुख्यमंत्री असलो तरी आधी मी एक कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणूनच तुमच्यासाठी काम करत राहणार असे यावेळी शिंदे म्हणाले.
9/11

यावेळी ग्रामीण भागातील अनेक नागरिक मोठ्याप्रमाणावर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते.
10/11

विशेष म्हणजे या ठिकाणी महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती. तर काही महिला वेगवेगळ्या वेशभूषा करून याठिकाणी आल्या होत्या.
11/11

तसेच 'शासन आपल्या दारी' योजनेतील हजारो लाभार्थी देखील या ठिकाणी हजर असल्याचे दिसून आले.
Published at : 26 May 2023 09:02 PM (IST)
आणखी पाहा























