एक्स्प्लोर
छ. संभाजीनगर महानगरपालिकेकडून अतिक्रमणविरोधात कारवाई, पाहा फोटो
Chhatrapati Sambhaji Nagar : बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमण महानगरपालिका पथकाने काढून घेतले आहेत.
Photo : छ. संभाजीनगर महानगरपालिकेकडून अतिक्रमणविरोधात कारवाई, पाहा फोटो
1/8

छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या दणक्यानंतर महानगरपालिका कामाला लागली असून, अतिक्रमण हटाव विभागाने शहरातील अनेक भागातील अतिक्रमण काढून त्यावर जेसीबी फिरवला आहे.
2/8

शहरातील टीव्ही सेंटर, कॅनॉट परिसरातील बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमण महानगरपालिका पथकाने काढून घेतले आहेत. सोबतच रस्त्यावर लावण्यात आलेल्या गाड्या देखील काढण्यात आल्या आहेत.
3/8

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, स्वामी विवेकानंद नगर गार्डन समोरील एन-13 परिसरात अतिक्रमण पथकाने नागरिकांचे मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना सूचना देऊन त्यांना अतिक्रमित जागेची मार्किंग करून दिली होती.
4/8

तसेच अतिक्रमणामध्ये रसवंती गृह, पंक्चरचे दुकान, दहा बाय दहा बाय पंधराचे कंपाउंड वॉल आणि लोखंडी जीने काढणे बाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
5/8

यानंतर सदर पथकाने महानगरपालिकेच्या मालकीच्या टीव्ही सेंटर मार्केट परिसरातील हॉटेल स्वराज्यच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या दोन लोखंडी टपऱ्या जप्त करण्यात आल्या.
6/8

सोबतच कॅनॉट परिसरातील एकूण 13 हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.या परिसरातील उद्यानाच्या बाजूला असलेला फुटपाथ मोकळा करण्यात आला.
7/8

याठिकाणी असलेले सर्व अतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी अतिक्रमण धारकांनी पथकाशी मोठ्या प्रमाणावर वाद घातला. परंतु पथक प्रमुख वसंत भोये यांनी यास न जुमानता कारवाई सुरू ठेवली यामुळे फुटपाथ मोकळा झाला आहे.
8/8

तसेच शहरातील हडको टीव्ही सेंटर परिसरातील तीन रस्त्यावरचे शेड काढण्यात आले आहेत. दोन चारचाकी मोठ्या बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
Published at : 25 Mar 2023 02:50 PM (IST)
आणखी पाहा























