एक्स्प्लोर
Photo: छत्रपती संभाजीनगरमध्ये 30 वर्षांचे अतिक्रमण जमीनदोस्त, पाहा फोटो
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणविरोधात कारवाई सुरु आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Encroachment
1/8

मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येत आहे.
2/8

टीव्ही सेंटर येथे महानगरपालिकेच्या शौचालयालगत वीस बाय पन्नास या आकाराच्या जागेत मागील तीस वर्षापासून असलेले चार दुकानांचे अतिक्रमण पाडण्यात आले आहे.
3/8

अनधिकृत बांधकाम करुन दहा बाय पंधराच्या जागेवर अतिक्रमण करून भजी वडापाव व चहाचे स्टॉल टाकण्यात आले होते.
4/8

महानगरपालिकेचा भाडे करारनामा काहीच नसताना सर्रास खुलेआम मागील तीस वर्षापासून अतिक्रमण सुरु होते.
5/8

त्यामुळे जिजाऊ चौकामधील हे अतिक्रमण काढण्यात आले व शौचालय जाण्यासाठी पूर्णपणे रस्ता मोकळा करण्यात आला.
6/8

यावेळी अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, पत्र्याचे शेड व दुकानांचे ओटे,पत्र्याचे शेड काढल्यामुळे पूर्णपणे रस्ता मोकळा झाला आहे.
7/8

मागील दोन दिवसांपासून विषय गाजत असलेल्या एन-5 येथील गोखले ईमारत देखील यावेळी पाडण्यात आली आहे.
8/8

याशिवाय महानगरपालिकेच्या पथकाने छोटे-मोठे लहान बोर्ड काढून रस्ता मोकळा केला आहे.
Published at : 18 Mar 2023 03:07 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















