Harley Davidson Sportster S : हार्ले-डेव्हिडसनने भारतात आपली रिवोल्यूशन मॅक्स इंजिन असणारी स्पोर्टस्टर एस (Sportster S) लॉन्च केली आहे.
2/7
याची किंमत 15.51 लाख रुपये आहे. स्पोर्टस्टर एस (Sportster S) अमेरिकन मोटरसायकल कंपनीच्या सर्वात अॅडव्हान्स क्रूजरपैकी एक आहे.
3/7
यापैकी लिक्विड-कूलिंग, डुअल ओव्हरहेड कॅमशाफ्ट आणि व्हेरिएबल वॉल्व टायमिग यांसारखं अद्यायावत तंत्रज्ञान वापरलं आहे. हार्ले-डेविडसन स्पोर्टर एस तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. विविड ब्लॅक, स्टोन वाश व्हाइट पर्ल आणि मिडनाइट क्रिमसनमध्ये उपलब्ध आहे.
4/7
हार्ले-डेव्हिडसन स्पोर्टस्टर एसचं इंजिन 119.3bbhp च्या पॉवरचं आहे. तर 127.4Nm चं पीक टॉर्क जेनरेट होतं. यामध्ये 6-स्पीड गियरबॉक्स आणि स्लिपर क्लच आहे.
5/7
या बाईकमध्ये एक गोल 4.0-इंच-व्यास TFT स्क्रीन देण्यात आली आहे. जी इंस्ट्रमेंटेशन आणि इंफोटेनमेंटची सुविधा देते. हे नेव्हिगेशन आणि इतर कामांसाठीही सक्षम आहे. यामध्ये ब्ल्यूटूथही देण्यात आली आहे.
6/7
हार्ले-डेव्हिडसन स्पोर्टस्टर एसमध्ये ऑल-एलईडी लायटिंग, क्रूज कंट्रोल आणि टायर प्रेशन मॉनिटरिंग सिस्टम यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये चार रायडिंग मोड्स-रोड, स्पोर्ट्स, रेन आणि कस्टम यांसारखे फिचर्स मिळतात.
7/7
यामध्ये कॉर्नरिंग एन्हांस्ड अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमही (C-ABS) देण्यात आली आहे. यामध्ये एक 320 मिमी डिस्क आणि 260 मिमी डिस्कही देण्यात आली आहे.