एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2022 : अमरावतीत देश-विदेशातील तब्बल 400 हून अधिक गणेश मूर्ती एकाच घरी विराजमान
Ganesh Chaturthi 2022 : अमरावती शहरातील खंडेलवाल कुटुंबियांच्या घरी तब्बल 400 हून अधिक गणेश मूर्ती विराजमान झाल्या आहेत.

Ganesh Chaturthi 2022
1/8

घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगम झालं आहे. गणेशोत्सवा निमित्ताने सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते.
2/8

असाच गणेशोत्सवाचा उत्साह अमरावतीतही पाहायला मिळाला. अमरावतीततील खंडेलवाल कुटुंबियांनी एक नाही दोन नाही तर तब्बल 400 गणेश मूर्ती घरी विराजमान केल्या आहेत.
3/8

अमरावतीत राहणारे खंडेलवाल कुटुंब गेल्या 25-30 वर्षांपासून बाप्पांची प्रतिष्ठापना करतात.
4/8

या मूर्तींचं वैशिष्ट्य म्हणजे या मूर्ती मराठवाड्यापासून ते अगदी कन्याकुमारीपर्यंत देश-विदेशातील प्रत्येक प्रांतातून आणल्या आहेत.
5/8

सुरुवातीला 11 मूर्तींपासून विविध गणेश मूर्ती स्थापना करण्याची परंपरा खंडेलवाल कुटुंबियांनी केली होती. मात्र, आता हा संग्रहित मूर्तींचा आकडा 400 हून अधिक झाला आहे.
6/8

विशेष म्हणजे, गणपती सजावटीसाठी तयार करण्यात आलेला देखावा हा टाकाऊ वस्तूंपासून बनविण्यात आला आहे.
7/8

काही मूर्ती दगडावर आहेत, काही मार्बलवर तर काही वेगवेगळ्या धान्यांपासून घरी तयार केलेल्या मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळतात.
8/8

देश-विदेशातील या विविध गणेश मूर्ती सध्या सगळ्यांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतायत.
Published at : 06 Sep 2022 01:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
