एक्स्प्लोर
दुबईतून शिर्डीत आलं गोल्डन नेम ॐ साई; साईबाबांच्या चरणी सोन्याचं भरभरुन दान, किंमत किती?
जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानांपैकी एक म्हणजे शिर्डीतील साईबाबा. शिर्डी साईबाबाच्या चरणी नतमस्तक होण्यास जगभरातून भाविक येतात.
om sai goldan name of dubai
1/7

जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानांपैकी एक म्हणजे शिर्डीतील साईबाबा. शिर्डी साईबाबाच्या चरणी नतमस्तक होण्यास जगभरातून भाविक येतात.
2/7

नववर्षाच्या सुरुवातीला शिर्डीतील साई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते, त्यातच भक्तांकडून साईचरणी भरभरुन दानही दिलं जातं. रोख, मौल्यवान दागिने आणि ऑनलाईन पद्धतीनेही दान टाकलं जातं.
3/7

साईबाबांच्या प्रती आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक साईबाबांना भरभरून दान देत असतात. आज दुबई येथील एका साईभक्ताने तब्बल 270 ग्रॅम वजनाचे, आकर्षक नक्षीकाम असलेले सोन्याचे नाव अर्पण केलं आहे.
4/7

सुवर्णातील "ॐ साई" हे नाव साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आलं आहे. या सुवर्ण दानाची किंमत बाजारभावाप्रमाणे साडे चोवीस लाख रुपये असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
5/7

देणगीदार भाविकाने सदर सुवर्ण "ॐ साई" हे नाव संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर सुपुर्द केल्याचे त्यांनी सांगितले.
6/7

मंदिर परिसरातील द्वारकामाई येथील भिंतीवर ते बसविण्यात आले असून दुबई येथील भाविकाने हे दान दिले आहे.आपले नाव जाहीर न करण्याची विनंती सदर भाविकाने साईबाबा संस्थानला केलीय. यावेळी संस्थानच्या वतीने देणगीदार साईभक्तांचा सत्कार करण्यात आला.
7/7

दरम्यान, साई मंदिर चरणी वर्षभरात कोट्यवधींचे दान प्राप्त होते, त्यात नववर्षाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात भाविक आपल्या मनातील इच्छापूर्ती बोलत दान अर्पण करत असतात
Published at : 12 May 2025 05:09 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















