Weather Update: पुण्यासह साताऱ्यात मिनी काश्मीरचा फील; थंडीच्या अलर्टमुळे शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी, पारा आणखी घसरण्याची शक्यता
Weather Update: महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १० अंशावर आहे. पुण्यातील तापमानात दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. त्यामुळे पुणेकर गुलाबी थंडी अनुभवत आहे.

पुणे: राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा या ठिकाणी कडाक्याची थंडी (maharashtra Weather Update) पडली आहे.महाबळेश्वरपेक्षाही पुणे गारठल्याचं आज दिसून येत आहे, पुण्यात थंडी चांगलीच वाढली आहे. पुण्याचं तापमान ७ अंश सेल्सियसवरती पोहचलं आहे, तर महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १० अंशावर आहे. पुण्यातील (Pune News) तापमानात दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. त्यामुळे पुणेकर गुलाबी थंडी अनुभवत आहे. (maharashtra Weather Update)
Weather Update: साताऱ्यात येऊ लागला मिनी काश्मीरचा फील
महाबळेश्वर पेक्षा साताऱ्यात थंडीचा कडाका वाढला आहे. थंडी वाढल्यामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांची संख्या घटली असल्याचं दिसून येत आहे. साताऱ्यात थंडीचा कडाका प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा झपाट्याने खाली येत आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राचा मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर पेक्षाही जास्त थंडी साताऱ्यात पडली आहे. महाबळेश्वरचे १० अंश सेल्सिअस तापमान आहे तर साताऱ्यात ९ अंश सेल्सिअस तापमान आहे. त्यामुळे साताऱ्यातच मिनी काश्मीर असल्याचा फील येऊ लागला आहे. सातारासह ग्रामीण भागात जागोजागी काही प्रमाणात शेकोट्या पेटवल्या जात आहेत. मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांची संख्या घटली आहे.
Weather Update: थंडीच्या यलो अलर्टमुळे शाळेच्या वेळेत बदल करा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जळगावमध्ये शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे.पश्चिमी अति थंड कोरड्या वाऱ्यांच्या झोतामुळे ठिकठिकाणी थंडीची लाट किंवा लाट सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे २० ते २५ डिसेंबर पर्यंत थंडीची तीव्रता राहणार आहे. शाळांमध्ये थंडीमुळे सुट्टी जाहीर करणे किंवा वेळेत बदल करणे हा निर्णय प्रशासकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन संबंधित असतो. मात्र मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता जपली जावी हे यामागे मुख्य कारण आहे. तापमानाची तीव्रता (५ डिग्री ते ८ डिग्री), अती थंडी लाट, दाट धुके तसेच काही विद्यार्थी यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते म्हणून त्यांना थंडी लवकर लागते. थंडीमुळे शाळांना सुट्टी देण्यामागे किंवा वेळेत बदल संविधानाचे कलम २१ (सुरक्षित जीवनाचा हक्क) हे नैतिक आणि कायदेशीर आधार आहे. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेऊन जळगांव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण शाळा व्यवस्थापन यांना शाळेच्या वेळेत काही दिवसासाठी बदल करण्यासाठी सूचना कराव्यात अशी विनंती ठाकरेंच्या पक्षाकडून करण्यात आली आहे.
Weather Update: जळगाव जिह्यात सध्या थंडीची लाट
कडाक्याच्या उन्हाळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिह्यात सध्या थंडीची लाट पसरली असून आज जळगावचे तापमान ६.५ अंश सेल्सिअसवरती आले आहे. अनेक नागरिक सकाळी सकाळी बाहेर पडताना गरम कपड्याचा वापर करत आहेत. जागोजागी शेकोट्या पेटल्या आहेत. तर सलग चौथ्या दिवशी दापोलीचा तापमानाचा पारा घसरला आहे, दापोलीकरांना हुडहुडी भरली आहे.
तापमान ६.५ वर अंश सेल्सिअसवरती आले आहे. तर खेड चिपळूण गुहागरमध्ये देखील थंडीची लाट पसरली आहे.























