India vs Pakistan U19 Asia Cup Live : युएईची धुलाई केल्यानंतर आता वैभव सूर्यवंशीच्या टार्गेटवर पाकिस्तान! भारत-पाक LIVE सामना कधी, कुठे अन् कसा पाहायचा?
IND vs PAK U19 Asia Cup 2025 Live Streaming Marathi News : आशियातील दोन सर्वात बलाढ्य क्रिकेट संघ आमनेसामने येणार म्हटल्यावर, तो सामना कोणत्याही स्तराचा किंवा फॉरमॅटचा असो, थरार ठरलेलाच असतो.

India vs Pakistan U19 Asia Cup 2025 Live Streaming : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक 2026 च्या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे, पण त्याआधी, अंडर-19 आशिया कप 2025 ची वेळ आली आहे. आशियातील दोन सर्वात बलाढ्य क्रिकेट संघ आमनेसामने येणार म्हटल्यावर, तो सामना कोणत्याही स्तराचा किंवा फॉरमॅटचा असो, थरार ठरलेलाच असतो. त्यामुळेच भारत–पाकिस्तान अंडर-19 लढतीसाठीही क्रिकेटप्रेमी प्रचंड आतुरतेने वाट पाहत आहेत.
या सामन्याभोवती असलेल्या प्रचंड उत्सुकतेचं एक मोठं कारण म्हणजे अवघ्या 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi). आपल्या आक्रमक आणि निर्भीड फलंदाजीने त्याने संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र हा हायव्होल्टेज सामना कधी होणार? कुठे पाहता येणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. त्याच प्रश्नांची उत्तरं इथे मिळणार आहेत.
भारत–पाकिस्तानची विजयी सुरुवात
शुक्रवार, 12 डिसेंबरपासून यूएईमधील दुबई येथे एसीसी अंडर-19 मेंस आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी भारतीय संघ मैदानात उतरला आणि कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारताने यजमान यूएईचा 234 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) अपेक्षेप्रमाणेच वादळी फलंदाजी करत अवघ्या 95 चेंडूंमध्ये 171 धावा ठोकल्या आणि आपली छाप पाडली.
दुसरीकडे पाकिस्तान संघानेही पहिल्याच सामन्यात ताकद दाखवली. त्यांनीही 297 धावांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला. पाकिस्तानकडून सलामीवीर समीर मिन्हास (Sameer Minhas) याने 177 धावांची जबरदस्त खेळी खेळली. आता या दोन्ही संघांची विजयी घोडदौड थेट एकमेकांवर आदळणार आहे. भारत–पाकिस्तान अंडर-19 सामना म्हणजे केवळ एक मॅच नाही, तर तो असणार थरार आणि भविष्यातील स्टार्सचा महासंग्राम आहे.
भारत-पाक LIVE सामना कधी, कुठे अन् कसा पाहायचा?
अंडर 19 आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामना कधी, किती वाजता, कुठे खेळला जाईल?
या स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना रविवार, 14 डिसेंबर रोजी खेळला जाईल. या एकदिवसीय स्पर्धेतील सर्व सामने सकाळी 10:30 वाजता सुरू होतील. टॉस सकाळी 10 वाजता होईल. ग्रुप अ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळला जाईल.
टीव्हीवर भारत-पाकिस्तान सामना कुठे पाहू शकतो?
हा सामना टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जात आहे आणि सोनी स्पोर्ट्स टेन-1 वर पाहता येईल.
भारत-पाकिस्तान सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग मी कुठे पाहू शकतो?
टीव्ही व्यतिरिक्त, अंडर-19 आशिया कप ऑनलाइन देखील प्रसारित केला जात आहे आणि भारत-पाकिस्तान सामन्याचे हे स्ट्रीमिंग सोनी लिव्हवर पाहता येईल.
हे ही वाचा -





















