एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Vitamin B12 Deficiency : व्हिटॅमिन B12 कमी? स्मरणशक्तीवर होऊ शकतो मोठा परिणाम!
Vitamin B12 Deficiency : B12 कमी झाल्यावर मेंदू आणि नसांचे कामकाज कमकुवत होऊ शकतात.
Vitamin B12 Deficiency
1/11

विसरणे किंवा जास्त विचार करणे हे अनेकदा थकवा किंवा तणावामुळे होऊ शकतं. पण यामागे व्हिटॅमिन B12 ची कमतरताही मोठं कारण असू शकतं.
2/11

B12 कमी झाल्यावर मेंदू आणि नसांचे कामकाज कमकुवत होऊ शकतात. अनेक वेळा अशी लक्षणं शरीरातील व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळेही दिसून येतात.
3/11

व्हिटॅमिन B12 हे मेंदू आणि नसांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक पोषक तत्व आहे. शाकाहारी लोकांमध्ये या व्हिटॅमिन कमतरता जास्त प्रमाणात आढळतात.
4/11

वृद्ध व्यक्तींच्या पचनशक्ती कमी झाल्याने B12 चे शोषण व्यवस्थित होत नाही. व्हिटॅमिन B12 च्या अभावामुळे लक्ष केंद्रित करण्यात अडथळे निर्माण होतात.
5/11

स्मरणशक्ती कमी होणे हे B12 कमी असल्याचे एक सामान्य लक्षण आहे. मेंदूतील पेशी व्यवस्थित कार्य करण्यासाठी B12 सतत आवश्यक असते.
6/11

शरीरातील होमोसिस्टीनचे प्रमाण वाढल्यास मेंदूच्या पेशींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतं. मिथाइलकोबालामिन मेंदूची स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता टिकवून ठेवण्यात मदत करते.
7/11

एडेनोसिलकोबालामिन नसांना संरक्षित ठेवणाऱ्या मायलिन शीथला मजबूत बनवतो. दीर्घकाळ B12 कमी राहिल्यास डिमेंशियाचा धोका देखील वाढू शकतो.
8/11

पचनासंबंधी आजारांमुळे B12 चे शोषण कमी होण्याची शक्यता असू शकते. मेटफॉर्मिन किंवा आम्लनाशक औषधांचा दीर्घकालीन वापरही B12 कमी करू शकतॊ. .
9/11

ज्यांच्या आहारात प्रथिनयुक्त पदार्थ कमी असतात त्यांच्यात B12 कमी आढळतो. प्रदूषण आणि जीवनशैलीतील अनियमितता यामुळेही या कमतरतेचा धोका वाढू शकतो.
10/11

वेळेवर निदान आणि उपचार केल्यास B12 ची कमतरता सहजपणे भरून काढता येते. योग्य आहार, सप्लिमेंट्स आणि नियमित तपासणी यांच्या मदतीने मेंदूचे आरोग्य टिकवून ठेवता येते.
11/11

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 14 Nov 2025 04:43 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























