एक्स्प्लोर
Foreign Destination : कमी खर्चात करायचा आहे परदेशात प्रवास, तर या ठिकाणी नक्की जा...
Foreign Destination : सुट्ट्यांमध्ये तुम्हांला कमी खर्चात परदेशांत प्रवास करयचा असेल तर या देशांना भेट द्या. या देशांत मिळू शकतो परदेशी फिरण्याचा आनंद.
Travel Tips
1/10

व्हिएतनाम (Vietnam): कमी खर्चात फिरता येणाऱ्या देशांमध्ये व्हिएतनाम समावेश आहे. येथे तुम्ही तुमची सुट्टी अगदी तुमच्या बजेटमध्ये पूर्ण करु शकता.
2/10

सुंदर दृश्ये, स्वादिष्ट पदार्थ, अद्वितीय संस्कृती येथे पाहण्यासारखी आहे. येथील हनोई, हो ची मिन्ह, हॅलोंग बे ही शहरे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जातात.
3/10

मोरोक्को (Morocco): कमी बजेटमध्ये परदेशात फिरण्यासाठी मोरोक्को हे खूप चांगले ठिकाण आहे. येथील समृद्ध इतिहास आणि संस्कृती खूपच सुंदर आहे.
4/10

मॅराकेच आणि फेस सारखी शहरे पर्यटकांना आवडतात. सहारा वाळवंटाला भेट देण्यासाठी पर्यटक याठिकाणाला भेट देतात.
5/10

मेक्सिको (Mexico):उन्हाळ्यात मेक्सिकोला जाणे खास ठरेल. येथील सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन अवशेष आणि स्वादिष्ट पाककृती तुमची सुट्टी मजेदार बनवतील.
6/10

इथली हॉटेल्स खूप स्वस्त आहेत आणि कमी पैशात तुम्ही कॅनकून, टुलम किंवा मेक्सिको सिटीला भेट देऊ शकता.
7/10

कोस्टा रिका (Costa Rica): कोस्टा रिका उष्णकटिबंधीय नंदनवनासाठी सर्वात प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही तुमची उन्हाळी सुट्टी घालवू शकता.
8/10

हायकिंग, सर्फिंग आणि झिप-लाइनिंगसह विविध गोष्टींचा आनंद तुम्हाला घेता येईल. हिरवीगार जंगले, ज्वालामुखी आणि सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात.
9/10

पोर्तुगाल (Portugal): जर तुम्हाला कमी बजेटमध्ये परदेशात जायचे असेल तर तुम्ही पोर्तुगाल निवडू शकता. इथली गावं तुम्हाला खूप आकर्षित करतील, जेवणाची चव तुमच्या मनाला भुरळ घालेल.
10/10

येथे वस्तू खूप स्वस्त आहेत. पोर्तुगालमधील लिस्बन हे ऐतिहासिक शहर खूप सुंदर आहे. आल्गारवे परिसरातील सुंदर समुद्रकिनारे नजरेच्या टप्प्यात भरतात.
Published at : 08 May 2023 06:04 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
भारत
बातम्या
























