एक्स्प्लोर

Navi Mumbai :पैश्यासाठी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा महिलेचा आरोप; मनसेकडून अमराठी व्यक्तीला कार्यालयात बोलवून चोप

Navi Mumbai News: कामाच्या ठिकाणी महिला सहकारी यांना पैश्यासाठी शिवीगाळ करून अश्लील भाषा वापरून नाहक त्रास देण्यात आल्याचा दावा करत मनसेकडून हा चोप देण्यात आल्याचे बोललं जात आहे.

Navi Mumbai News : राज्यभरात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असताना मुंबईसह राज्यभर मराठी अस्मितेचा आवाज उठवणाऱ्या मनसेनं (MNS) पुन्हा एका अमराठी व्यक्तीला मारहाण केल्याची बातमी समोर आली आहे. मनसेकडून कार्यालयात बोलवून या अमराठी व्यक्तीला चोप देण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी महिला सहकारी यांना पैश्यासाठी शिवीगाळ करून अश्लील भाषा वापरून नाहक त्रास देण्यात आल्याचा दावा करत मनसेकडून हा चोप देण्यात आल्याचे बोललं जात आहे. तसेच मराठी कंपनी मालकाला सुद्धा शिवीगाळ केली, म्हणून मनसे सहकार सेनेचे बाळासाहेब शिंदे यांनी शुक्ला नावाच्या एका अमराठी व्यक्तीला कार्यालयात बोलावून चोप दिला आहे.

MNS : महाराष्ट्रात अशी मुजोरी चालू देणार नाही, लिखित माफीनामा

दरम्यान, या कृत्यासाठी महिलेची माफी मागायला लावून मनसेने लिखित माफीनामा घेतला. महाराष्ट्रमध्ये राहून मराठी महिलाना अपशब्द बोलणार नाही, असा समज ही मनसेकडून देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात अशी मुजोरी चालू देणार नाही. असा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे. नवी मुंबईच्या वाशी येथे हा प्रकार घडला असून या प्रकरणी अद्याप पोलिसांनी हस्तेक्षेप केल्याची माहिती आहे.

Raigad News: नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसेची रायगडमध्ये युती

राज्यात आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने जोरदार तयारी करण्यात येत आहे. अशातच मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढत असताना दुसरीकडे रायगडमध्ये (Raigad News) नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसेची युती झाल्याचे चित्र आहे. उरण नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र निवडणुकीला समोर जात असल्याची माहिती पुढे आली आहे. प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो झळकला आहे.

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर नगराध्यक्ष निवडणुकीसाठी लढणार असल्याची माहिती आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे उरण नगरपालिकेच्या मैदानात भिडणार आहे. उरण नगरापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षाला सोबत न घेता भाजप स्वतंत्र लढणार असल्याची माहिती आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
Alia Bhatt: आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
Embed widget