RCB Retained Players List 2026 : लैंगिक शोषणमुळे कायद्यांतर्गत गुन्हा, तरी RCB ने 'त्या' खेळाडूला केलं रिटेन, बंगळुरूने कोणाला संघात कायम ठेवले, कोणाला सोडले?
RCB Retained Players List 2026 Marathi News : आयपीएल 2026 साठी खेळाडूंना कायम ठेवण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर 2025 रोजी संपली.

RCB Retained Players List 2026 Update : आयपीएल 2026 साठी खेळाडूंना कायम ठेवण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर 2025 रोजी संपली. लिलावापूर्वी सर्व 10 संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादी जाहीर केल्या आहेत. 173 खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे, ज्यात 49 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. सर्व फ्रँचायझींमध्ये सध्या 77 जागा रिक्त आहेत. यासाठी एक मिनी-लिलाव आयोजित केला जाईल. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आयपीएल 2026 साठी जाहीर केलेल्या रिटेन्शन यादीत यश दयालचाही समावेश केला आहे.
मात्र, या निर्णयावर आता मोठा वाद निर्माण झाला आहे, कारण यश दयालवर सध्या दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये एक प्रकरण पॉक्सो कायद्यानुसार नोंदवलेले आहे. गेल्या वर्षी आरसीबीने त्याला 5 कोटी रुपयांत रिटेन केले होते.
यश दयालविरुद्ध दोन गुन्हे दाखल
यश दयालविरुद्ध गाझियाबाद आणि जयपूर येथे दोन गुन्हे दाखल आहेत आणि दोन्हीही प्रकरणे लैंगिक शोषणाशी संबंधित आहेत. त्यामुळे आरसीबीने त्याला पुन्हा रिटेन करण्याच्या निर्णयावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अनेकांनी असा आरोप केला आहे की, इतक्या गंभीर आरोपांनंतरही यशला रिटेन करून RCB समाजात चुकीचा संदेश देत आहे.
आरसीबी फ्रँचायझीकडून या विषयावर अद्याप कोणतेही स्वतंत्र निवेदन देण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे, खेळाडूवरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बीसीसीआयशी संपर्क साधला आहे की नाही, याबाबतही कोणतीही माहिती दिलेली नाही. लक्षात घ्यावे की, आयपीएल 2025 च्या फायनलनंतर यश दयालने एकही स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही.
🔐 𝗥𝗘𝗧𝗔𝗜𝗡𝗘𝗗: They gave us our first trophy, and they’re coming HOME to do it all over again. 🏆
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) November 15, 2025
Presenting, the first 1️⃣7️⃣ entrants of RCB’s #ClassOf2026, ready to #PlayBold and entertain the best fans in the world. ❤️#ನಮ್ಮRCB #IPL2026 pic.twitter.com/NhgpWNRbjB
यावर्षी ऑगस्टमध्ये प्रकरणांची गंभीरता पाहता यूपी टी–20 लीगच्या आयोजकांनी यश दयालला स्पर्धेतून प्रतिबंधित केले होते. तो गोरखपूर लायन्सकडून खेळणार होता. त्याचबरोबर चालू डोमेस्टिक हंगामामध्येही तो उत्तर प्रदेशकडून एकही सामना खेळताना दिसलेला नाही. या सर्व घडामोडींमुळे त्याच्या क्रिकेटकरिअरवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'हे' खेळाडू सोडले (RCB Released Players list) :
स्वस्तिक चिकारा, मयंक अग्रवाल, टिम सेफर्ट, मनोज भडांगे, लियाम लिव्हिंगस्टोन, लुंगी एनगिडी, मोहित राठी.
आरसीबीच्या पर्समध्ये ₹16.4 कोटी शिल्लक आहेत, 2 परदेशींसह 8 खेळाडूंच्या जागा आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी (RCB Retained Players list) :
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जेकब बेथेल, जोश हेजलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिक शर्मा, अभिनंद सिंग, अभिनंद सिंग, अभिषेक.
हे ही वाचा -





















