निवडणुकीत पैसा खर्च करावाच लागतो, लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं आहे त्यांनाच देतात, समजने वालों को इशारा काफी है! प्रफुल पटेलांचा रोख कोणाकडे?
निवडणूक रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यांनी राज्यांमध्ये पुन्हा एकदा राजकीय वादंग निर्माण करण्याची चिन्हे आहेत.

Prafull Patel On Money Distribution: बिहार निवडणुकीमध्ये आचारसंहिता असतानाही महिलांच्या खात्यामध्ये दादा हजार रोख आल्याने विरोधकांकडून निवडणूक आयोगासह भाजपवरती सडकून प्रहार सुरू आहे. ही टीका होत असतानाच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. निवडणूक रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यांनी राज्यांमध्ये पुन्हा एकदा राजकीय वादंग निर्माण करण्याची चिन्हे आहेत.
निवडणुकीमध्ये पैसे वाटावेच लागतात
प्रफुल पटेल म्हणाले की, निवडणुकीमध्ये पैसे वाटावेच लागतात आणि पैसे वाटले तरी मतदार पैसे घेऊन ज्याला मत द्यायचं त्यालाच देतात. त्यांनी पैशांवरून वक्तव्य करत एक प्रकारे वादाला फोडणी दिल्याची चर्चा रंगली आहे. पटेल यांच्या वक्तव्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. पटेल बोलताना म्हणत आहेत की कोणी स्वतःला बाहुबली समजू नये. अनेक बाहुबलींना आम्ही निवडून दिलं आहे असेही प्रफुल पटेल म्हणताना दिसत आहेत.
समजनें वालों को इशारा काफी हैं
पटेल म्हणाले की मागील काळामध्ये किती बाहुबलींना आम्ही निवडून दिले आहे याची आम्हाला माहिती आहे. ते म्हणाले की, निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी केवळ पैशांचा आधारे कोणीच निवडून येत नाही. मतदारांच्या भूमिकेबद्दल ते म्हणाले की, लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं असतं त्यांनाच ते देतात. त्यांनी पुढे असेही म्हटले की समजनें वालों को इशारा काफी हैं. त्यामुळे आता हा इशारा नेमका त्यांनी कोणासाठी दिला याची चर्चा रंगली आहे. दरम्यान या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी पटेल यांनी दिलेला इशारा आमच्यासाठी नसल्याचं म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























