Chandrahar Patil Majha Katta LIVE : देशभर गाजलेली Bailgada Sharyat , जिंकलेले मालक माझा कट्टावर
देशातील सगळ्यात मोठया बैलगाडी शर्यतीचे (Baidgada Sharyat) पैलवान चंद्रहार पाटलांकडून 500 एकर मैदानावर आयोजन केलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैल शर्यती पार पडल्यात आणि ज्यामध्ये हेलिकॉप्टर बैज्या (helicopter baijya) आणि ब्रेकफेल (brake fail jodi) बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत एक फॉर्च्यूनर गाडी जिंकली. तर दुसरी फॉर्च्यूनर गाडी लखन (Lakhan) आणि सर्जा (Sarja) या बैलजोडीने जिंकली.
सदर शर्यतीचे मैदान संपल्यानंतर लगेचच चंद्रहार पाटील यांनी पुढच्या शर्यतीची घोषणा करत त्या स्पर्धेत बीएमडब्ल्यू बक्षीसाची घोषणा केली आहे. बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातला सगळ्यात मोठं मैदान सांगलीच्या तासगाव-बोरगाव जवळील कोड्याचा मळा येथे पार पडलं.फॉर्च्यूनर, थार, ट्रॅक्टर, बुलेट दीडशे दुचाकींसाठी हजारो बैलगाड्या गाड्या धावल्या. पैलवान चंद्रहार पाटील यांनी माझा कट्ट्यावर दिलखुलास संवाद साधलाय, पाहा...
All Shows

































