लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana KYC) केवासयी करण्यासाठी शेवटचे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो लवकरच केवायसी (KYC) करून घ्या, कारण जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. केवायसी करण्याची शेवटची तारीख ही 18 नोव्हेंबर देण्यात आलीये. त्याआधी राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींनी केवायसी करून घ्यावी. लाडक्या बहिणी आपल्या मोबाईलद्वारे देखील घरबसल्या केवायसी करू शकता. त्यासाठी सरकारी अधिकृत वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर जायचं आहे, आणि पात्र महिलेचा आधार कार्ड, पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड टाकून केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. पण बऱ्याच लाडक्या बहिणी या विधवा आहेत, किंवा कुणाचे वडील नाहीत, अशांना केवायसी करताना अडचणी येत आहेत. तर त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलीये. ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत, अशा लाडक्या बहिणींच्या केवायसीसाठी वेबसाई़टवर काही बदल केले जातील, अशा माहिती देखील मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे काहीही कागदपत्रे गमवावे लागलीत. त्यामुळे त्यांच्यासाठी केवायसी प्रक्रियेत मुदतवाढ देण्यात येईल, कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.