एक्स्प्लोर
Brushing Teeth : दिवसा ठीक, पण रात्रीचा ब्रश चुकवणं पडेल महागात, दंततज्ज्ञांनी सांगितलं मोठं कारण
Brushing Teeth : रात्री झोपण्यापूर्वी फ्लोराइडयुक्त टूथपेस्टने दोन मिनिटं ब्रश करणे आणि आठवड्यातून फ्लॉस करणे दात आणि हिरड्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहे.
Brushing Teeth
1/12

रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे खूप महत्त्वाचे असते, कारण यामुळे आपल्या दातांवर दिवसभर जमा झालेली घाण निघून जाते.
2/12

हे वाढलेले बॅक्टेरिया आपल्या दातांना आणि हिरड्यांना हळूहळू हानी पोहोचवू शकतात.
3/12

अनेक लोकं सकाळी उठून ब्रश करतात, पण रात्री ब्रश करण्याकडे दुर्लक्ष करतात.
4/12

दंततज्ज्ञ सांगतात की, तुम्ही सकाळी कधी कधी ब्रश चुकवला तरी चालेल, पण रात्रीचा ब्रश कधीही चुकवू नये.
5/12

रात्री ब्रश न केल्यास दात आणि हिरड्या दोन्हीही आजारी पडू शकतात आणि यामुळे मोठा त्रास निर्माण होऊ शकतो.
6/12

दिवसा आपल्या लाळेमुळे तोंडातील बॅक्टेरिया नियंत्रित राहतात आणि ते फार वाढत नाहीत.
7/12

जर तुम्ही प्लाक नीट साफ केला नाही तर त्यातून कॅविटी, तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्यांचे आजार होऊ शकतात.
8/12

हिरड्यांच्या कडेवर जमा झालेला प्लाक सूज, लालसरपणा आणि रक्त येण्यास कारणीभूत ठरू शकतं.
9/12

जर हिरड्यांची ही समस्या वाढली तर ती पायरिया सारख्या गंभीर आजारात बदलू शकते.
10/12

फ्लोराइडयुक्त टूथपेस्टने दोन मिनिटं ब्रश केल्याने दात अधिक मजबूत होतात आणि त्यांना कॅविटीपासून संरक्षण मिळू शकतं.
11/12

आठवड्यातून दोन ते तीन वेळा फ्लॉस केल्यास दातांच्या मधल्या जागेत साचलेली घाण काढली जाते आणि तोंड अधिक स्वच्छ राहते.
12/12

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 16 Nov 2025 12:09 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























