एक्स्प्लोर
Health Tips : 'हे' 5 पदार्थ चुकूनही गरम करू नका; आरोग्यासाठी घातक!
Health Tips : शिळे अन्न पुन्हा गरम केल्याने त्याचे पोषणमूल्य कमी होते. बटाटे वारंवार गरम केल्याने व्हिटॅमिन बी-6 नष्ट होते.
Health Tips
1/10

बटाटे वारंवार गरम केल्यास त्यात क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम नावाचा जीवाणू वाढू लागतो.
2/10

जरी बटाटा मध्ये व्हिटॅमिन बी-6, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात. पण, ते वारंवार गरम केल्याने हे सर्व पोषक घटक नष्ट होतात.
3/10

नायट्रेट युक्त भाज्या पालक, हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीट नेहमी पुन्हा गरम करणे टाळावे.
4/10

भाज्या पुन्हा गरम होण्याआधी, त्यांचे नायट्रेटमध्ये रूपांतर होते. जे तुमच्या शरीराच्या ऊतींसाठी हानिकारक ठरतात.
5/10

भूक लागल्यावर आपण उरलेला भात डाळी किंवा भाज्यांरोबर खातो. पण फूड स्टँडर्ड एजन्सीच्या मते, शिळा तांदूळ पुन्हा गरम केल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो.
6/10

भात पुन्हा गरम केल्याने भातामध्ये बॅसिलस सेरियस नावाचे अधिक प्रतिरोधक जीवाणू वाढू शकतात, ज्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते.
7/10

चिकन आणि अंडी यांसारखे मांसाहारी पदार्थ प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत मानले जातात. पण शिळे मांसाहारी पदार्थ पुन्हा गरम केल्यानंतर खाल्ले तर अन्नातून विषबाधा आणि पचनास त्रास होऊ शकतो.
8/10

म्हणून, मांसाहारी पदार्थ नेहमी ताजे खावे. तज्ञांच्या मते, या उच्च प्रथिनयुक्त अन्नामध्ये नायट्रोजन असते, जे पुन्हा गरम केल्यास हानिकारक ठरू शकते.
9/10

मशरूम हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे आणि त्यात खनिजे खूप चांगल्या प्रमाणात असतात. पण, ते पुन्हा गरम केल्याने त्यातील प्रथिने अनेक भागांमध्ये मोडतात. हे पदार्थ पचनसंस्थेला हानी पोहोचवण्यासाठी जबाबदार असतात.
10/10

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 03 Dec 2023 01:00 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
विश्व
भारत
व्यापार-उद्योग


















