एक्स्प्लोर
Hair Growth and Beauty : केसांची वाढ आणि त्वचेच्या सौंदर्यसाठी वापरा 'हे' टॉनिक
Hair Growth and Beauty : घरच्या घरी तयार होणारं हे टॉनिक सुंदर केस आणि स्वच्छ त्वचेसाठी खूप उपयोगी आहे. जाणून घ्या रेसिपी.
Hair Growth and Beauty
1/12

लवंगाचं पाणी हे केस आणि त्वचेसाठी एक उत्तम नैसर्गिक टॉनिक आहे. हे टॉनिक तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता.
2/12

जर याचा नियमित वापर केला तर तुमची त्वचा उजळेल आणि केस मजबूत व दाट राहतील.
3/12

यासाठी एका ग्लासात स्वच्छ पाणी घ्या आणि ते पातेल्यात ओता आणि त्या पाण्यात एक टेबलस्पून लवंग टाकून चांगले मिसळा.
4/12

हे पाणी साधारण 10 ते 15 मिनिटं उकळू द्या. उकळल्यावर पाणी थंड होण्यासाठी काही वेळ बाजूला ठेवा. थंड झालेलं पाणी एका बाटलीत भरून ठेवा.
5/12

या पाण्यात एक टेबलस्पून रोज वॉटर टाका. त्यात एक टेबलस्पून अॅलोव्हेरा जेल घ्या.
6/12

4 ते 5 थेंब टी ट्री इसेंशियल ऑईल टाका. बाटली नीट बंद करून हलवून सर्व घटक एकत्र करा.
7/12

हे तयार केलेले पाणी जर तुम्ही दिवसातून दोनदा चेहऱ्यावर स्प्रे केल्याने तुमची त्वचा ताजीतवानी आणि स्वच्छ वाटू लागेल.
8/12

या स्प्रेमुळे त्वचेवरील पिगमेंटेशन आणि डाग कमी होतात. हा स्प्रे तुम्ही केसांवर देखील वापरू शकता.
9/12

झोपण्यापूर्वी हा स्प्रे केसांच्या मुळांवर लावा. यामुळे केस गळणे कमी होते आणि मुळे मजबूत होतात.
10/12

लवंगाचं पाणी केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त असतं.हे मिश्रण त्वचेला थंडावा देऊन नैसर्गिक ग्लो वाढवतं.
11/12

हे नैसर्गिक टॉनिक त्वचा आणि केस दोघांसाठी फायदेशीर आहे. घरच्या घरी बनवलेले हे टॉनिक सुरक्षित, सोपे आणि प्रभावी आहे.
12/12

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Published at : 01 Nov 2025 05:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
पुणे
बातम्या























