एक्स्प्लोर
Benefits of Groundnut : शेंगदाणे खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे
Benefits of Groundnut : शेंगदाण्यात अंड्यांपेक्षा जास्त प्रमाणात आवश्यक प्रोटीन असतं. जाणून घ्या फायदे.
Benefits of Groundnut
1/13

महागडे ड्रायफ्रुट्स जसे की काजू, बदाम किंवा पिस्ता खाण्याऐवजी तुम्ही साधे शेंगदाणे खाऊ शकता. कारण त्यातही तितकेच पोषक घटक असतात.
2/13

अनेकांना हे माहीत नसतं की शेंगदाण्यात अंड्यांपेक्षा जास्त प्रमाणात प्रोटीन असतं. जसे की, प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात आढळतात.
3/13

पण तुम्हाला माहित का? शेंगदाणे केवळ चविष्टच नसतात, तर ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात.
4/13

ते केवळ तुमची ऊर्जा वाढवत नाही तर तुमचे हृदय, मेंदू, त्वचा आणि केस देखील निरोगी ठेवण्यास मदत करतं.
5/13

शाकाहारी लोकांसाठी शेंगदाणा हा उत्कृष्ट प्रोटीनचा स्रोत आहे आणि हे मसल्स वाढवण्यास देखील मदत करतं.
6/13

जर तुम्ही रोजच्या आहारात 25–30 ग्राम शेंगदाणे खाल्ले तर तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
7/13

शेंगदाण्यामुळे मेटाबॉलिझम सक्रिय राहतो, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.
8/13

हे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, कारण शेंगदाणे खाल्ल्याने दीर्घकाळ भूक लागत नाही.
9/13

त्यातील व्हिटॅमिन B3 आणि नियासिन मेंदूला बळकटी देतात आणि मेंदू ताजेतवाने ठेवण्यास मदत करतं.
10/13

शेंगदाण्यातील व्हिटॅमिन E त्वचेला नैसर्गिक चमक देते आणि ती अधिक मऊ बनवते. तसेच, शेंगदाणे केसांना पोषण देतात, त्यांना मजबूत आणि चमकदार ठेवतात.
11/13

शेंगदाण्याचे तेल नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकता. कारण हे तुमची त्वचा कोरडी होण्यापासून वाचवू शकते.
12/13

मधुमेही लोकांसाठी शेंगदाणे हा एक उत्तम आणि सुरक्षित नाश्त्याचा पर्याय आहे. कारण ते रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करतात.
13/13

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Published at : 02 Nov 2025 05:49 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















