एक्स्प्लोर
Blood Cancer : सावधान! त्वचेचा बदललेला रंग असू शकतं ब्लड कॅन्सरचं लक्षण, वेळीच सावध व्हा
Blood Cancer Symptoms : त्वचेचा बदललेला रंग रक्ताच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं, त्यामुळे वेळीच सावध व्हा. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.

Blood Cancer Symptoms
1/10

ब्लड कॅन्सर खूप धोकादायक आहे. ब्लड कॅन्सरला ल्युकेमिया असंही म्हणतात. ब्लड कॅन्सर बोन मॅरोमध्ये सुरू होतो आणि नंतर हळूहळू संसर्ग रक्तात पसरतो.(Image Source : istock)
2/10

ब्लड कॅन्सरचं निदान लवकर झालं तर जीव वाचवणं शक्य होतं. पण याचं निदान जर शेवटच्या टप्प्यात झालं तर, मात्र जीव वाचवणं फार कठीण आहे.(Image Source : istock)
3/10

ब्लड कॅन्सर टाळण्यासाठी तुमची जीवनशैली सुधारावी लागेल आणि निरोगी आहाराचे पालन करावं लागेल. (Image Source : istock)
4/10

चांगली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे तुम्ही हा आजार टाळू शकता.(Image Source : istock)
5/10

ब्लड कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे त्वचेवर दिसतात. पण ही लक्षणे ओळखणे फार कठीण आहे. (Image Source : istock)
6/10

रक्ताच्या कर्करोगाचा लाल रक्तपेशींवर खूप परिणाम होतो. त्यामुळे शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींची निर्मिती थांबते. (Image Source : istock)
7/10

ब्लड कॅन्सरच्या सुरुवातीला रुग्णाच्या त्वचेवर अनेक लक्षणे दिसतात. ज्याकडे दुर्लक्ष करणं फार महाग पडू शकतं. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास वेळेवर निदान आणि उपचार करणं खूप कठीण आहे.(Image Source : istock)
8/10

ब्लड कॅन्सर म्हणजेच ल्युकेमिया झाल्यास रुग्णाच्या त्वचेचा रंग बदलू लागतो. त्यामुळे शरीराचा रंग पिवळा होऊ लागतो. एवढेच नाही तर डोळेही पिवळे पडू लागतात. (Image Source : istock)
9/10

जर तुम्हाला रक्ताच्या कर्करोगाची लागण झाली असेल तर, त्वचेवर छोटी दुखापत किंवा जरा कापलं तरीही जास्त रक्तस्त्राव होतो. ब्लड कॅन्सरमुळे ल्युकेमिया कटिस नावाचा आजार होतो.(Image Source : istock)
10/10

ब्लड कॅन्सर तपासण्यासाठी डॉक्टर सीबीसी चाचणी केली जाते. जेव्हा कर्करोगाच्या रुग्णाची बायोप्सी केली जाते. या तपासणीद्वारे कर्करोग ओळखता येतो. (Image Source : istock)
Published at : 03 Dec 2023 03:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
भारत
मुंबई
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
