एक्स्प्लोर
Aishwarya Narkar: ट्रोलरला ऐश्वर्या नारकरनं दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली...
सोशल मीडियावरील व्हिडीओला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं ऐश्वर्या आणि अविनाश यांना ट्रोल केलं. या ट्रोलरला ऐश्वर्यानं सडेतोड उत्तर दिलं आहे.
(Aishwarya Narkar/Instagram)
1/8

ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अभिनेता अविनाश नारकर (Avinash Narkar) हे सोशल मीडियावर रिल्स शेअर करत असतात.
2/8

नुकताच ऐश्वर्या आणि अविनाश यांनी "रूप तेरा मस्ताना" या गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं ऐश्वर्या आणि अविनाश यांना ट्रोल केलं. या ट्रोलरला ऐश्वर्यानं सडेतोड उत्तर दिलं आहे.
3/8

ऐश्वर्या आणि अविनाश यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये या दोघांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे. ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या या व्हिडीओला "म्हातारचळ लागलेले आजी-आजोबा" अशी कमेंट करुन ट्रोल केलं. नेटकऱ्याच्या या कमेंटला ऐश्वर्यानं रिप्लाय दिला आहे.
4/8

ऐश्वर्यानं ट्रोलरच्या कमेंटला रिप्लाय दिलं, "बुद्धी गंजेल असे विचार करून, तुमच्या घराण्यात म्हातारचळ लागण्याचा रोग आहे वाटतं. जगून घ्या, गेलात तर दुसऱ्यांना बोलण्यात सगळंच राहून जाईल.. म्हातारचळचा अर्थही बघून घ्या जरा.. बुद्धी भ्रष्ट"
5/8

ऐश्वर्याच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
6/8

ऐश्वर्या ही विविध नाटकांमधून, मालिकांमधून आणि चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येते. या सुखांनो या, स्वामिनी, लेक माझी लाडकी, श्रीमंतघरची सून या मालिकांमधील ऐश्वर्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
7/8

तुच माझी भाग्य लक्ष्मी,कधी आचानक, अंक गणित आनंदाचे या मराठी चित्रपटांमधून ऐश्वर्या प्रेक्षकांच्या भेटीस आली.
8/8

सध्या ऐश्वर्या ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. ऐश्वर्या ही इन्स्टाग्रामवर विविध पोस्ट शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर 235K फॉलोवर्स आहेत.
Published at : 12 Oct 2023 07:25 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























