दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपट गाजला आणि त्यातलं प्रत्येक पात्र आपल्या परिचयाचं झालं.
2/8
अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्यासोबत असलेले सल्या आणि लंगड्याही भाव खाऊन गेले.
3/8
तानाजी गळगुंडेने लंगड्याची तर अरबाज शेखने सल्याची भूमिका साकारली होती. अरबाजने त्याच्या वाट्याला आलेली भूमिका अगदी चोख बजावली.
4/8
अर्थातच या चित्रपटासाठी अरबाजची निवड काही सहजासहजी झालेली नाही.
5/8
अरबाजला थोडीफार अभिनयाची आवड होती. तो नागराज मंजुळेंच्या गावातील शेजारीच. तो चित्रपटात घ्यावं म्हणून मंजुळेंच्या मागे लागायचा. शेवटी नागराज यांचा भाऊ भूषण मंजुळे यांच्याकडे त्यानं ऑडिशन दिले. त्याचा व्हिडिओ भूषण यांनी नागराजला पाठवला.
6/8
नागराजला पहिल्यांदा अरबाजचा अभिनय काही पसंत पडला नाही आणि त्यांनी त्याला रिजेक्ट केलं. यामुळे अरबाज बराच नाराज झाला होता. संपूर्ण रात्र त्याने रडून काढली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने ऑडिशन दिली. यावेळी मात्र त्याचं सल्याच्या भूमिकेसाठी कास्टिंग झालं.
7/8
अरबाजनं यानंतर मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर त्यानं काही चित्रपट आणि मालिकांमध्ये जबरदस्त काम केलं.
8/8
अरबाज सोशल मीडियावर सक्रिय असतो. तसेच तो सामाजिक कार्यातही नेहमी पुढं असतो. कोरोना काळात त्यानं अनेकांना मदत केली होती. सैराटमधील सल्या ते झुंडमधील राजूपर्यंत अरबाजनं आपल्या जबरदस्त अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.