एक्स्प्लोर
HBD Geeta Basra :वाचा हरभजन सिंहची पत्नी गीता बसराबद्द्ल...
(photo:geetabasra/ig)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा (Geeta Basra) आज (13 मार्च) तिचा 38वा वाढदिवस साजरा करत आहे. (photo:geetabasra/ig)
2/6

गीताचा जन्म इंग्लंडच्या पोर्ट्समाउथ येथे एका पंजाबी कुटुंबात झाला होता. गीता तिथेच लहानाची मोठी झाली आणि नंतर भारतात स्थायिक झाली (photo:geetabasra/ig)
3/6

गीताला कधीच अभिनेत्री व्हायचे नव्हते, तिला क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट बनण्यात अधिक रस होता. मात्र, भारतात येऊन तिने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. गीता ही भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हरभजन सिंहची पत्नी आहे. (photo:geetabasra/ig)
4/6

गीता आणि हरभजन या जोडीला दोन मुलं देखील आहेत. मनोरंजनविश्वापासून दूर असली तरी गीता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती दररोज मुलांसोबतचे आणि पतीसोबतचे फोटो शेअर करत असते. चित्रपटांपासून दूर असलेली गीता तिचे वैयक्तिक आयुष्य खूप एन्जॉय करत आहे. (photo:geetabasra/ig)
5/6

गीताने 4-5 वर्षे लंडनमध्ये थिएटर केले आणि नंतर किशोर नमित कपूरच्या मुंबईतील अभिनय शाळेत प्रवेश घेतला होता. (photo:geetabasra/ig)
6/6

2015 मध्ये गीता बसराने टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंहसोबत सात फेरे घेतले. गीता आणि हरभजन दोघेही एकमेकांना 3 वर्षांहून अधिक काळ डेट करत होते. हरभजनसोबत लग्न केल्यानंतर गीता इंडस्ट्रीपासून पूर्णपणे दूर राहिली. आता ती ना कुठल्या कार्यक्रमात, ना कुठल्या पुरस्कार सोहळ्यात, ना पार्टीत ना चित्रपटात कुठेही दिसत नाही. (photo:geetabasra/ig)
Published at : 13 Mar 2022 04:22 PM (IST)
आणखी पाहा























