एक्स्प्लोर

Shreya Ghoshal: 'कधी पैसे दिले जात नव्हते, तर कधी क्रेडिट...'; श्रेया घोषालकडून म्युझिक इंडस्ट्रीची पोलखोल, खुलासा करत म्हणाली...

श्रेयाच्या या वक्तव्यामुळे म्युझिक इंडस्ट्रीतील जुनी व्यवस्था आणि कलाकारांना मिळणाऱ्या हक्कांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Shreya Ghoshal: बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल हिने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये म्युझिक इंडस्ट्रीबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. आपल्या कारकिर्दीत ‘मनवा लागे’, ‘तेरी मेरी’, ‘बरसो रे’, ‘साथिया’, ‘मेरे ढोलना’, ‘हसी’, ‘चिकनी चमेली’ यांसारखी अनेक हिट गाणी देणाऱ्या श्रेयाने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. की 2013 पूर्वी गायक-गायिकांसोबत खूप वेगळ्या प्रकारे वागणूक दिली जात होती. असं ती म्हणालीय.

श्रेया अलीकडेच उद्योजक राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. या वेळी तिला 2013 हे वर्ष तिच्या करिअरमधील कठीण काळ का होतं, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ती म्हणाली की त्या काळात सिंगर्सनी रॉयल्टीच्या हक्कासाठी आवाज उठवला आणि त्यामुळे संपूर्ण इंडस्ट्री दोन भागांत विभागली गेली. (Shreya Ghoshal on Music Industry)

काय म्हणाली श्रेया घोषाल?

श्रेया म्हणाली, “आपल्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये कोणतीही ठराविक नियमपुस्तिका नाही. त्यामुळे त्या काळात खूप वाईट परिस्थिती होती. सिंगर्सना कोणताही करार दिला जात नव्हता, पैसेही वेळेवर मिळत नव्हते आणि अनेकदा गाण्यांमध्ये त्यांना योग्य क्रेडिटही दिलं जात नव्हतं. त्या गाण्यावर आमचा कोणताही हक्क नसल्यासारखं वातावरण होतं.” तिने पुढे सांगितलं की, त्या काळात परफॉर्मर, गायक आणि संगीतकार यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. “कधी पैसे दिले जात नव्हते, तर कधी क्रेडिटही दिलं जात नव्हतं. गाणं झालं की तुम्हाला त्याच्याशी काही देणंघेणं नाही, असं सांगितलं जायचं,” असंही ती म्हणाली.

2013 नंतर परिस्थितीत बदल

श्रेया घोषालने सांगितलं की 2013 हे वर्ष सिंगर्ससाठी टर्निंग पॉइंट ठरलं. त्या वेळी कलाकारांनी आपल्या हक्कासाठी ठाम भूमिका घेतली आणि त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये काही सकारात्मक बदल दिसू लागले. तिने असंही म्हटलं की फिल्मी पाठबळाशिवाय स्वतःचा मार्ग तयार करणाऱ्या कलाकारांबद्दल तिला खूप आदर आहे. कारण त्यांनी अनेक अडचणींचा सामना करत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.दरम्यान, श्रेयाच्या या वक्तव्यामुळे म्युझिक इंडस्ट्रीतील जुनी व्यवस्था आणि कलाकारांना मिळणाऱ्या हक्कांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ek Hota Malin Trailer: निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
'भूमिकेसाठी कपडे काढणं गरजेचं असेल तर ते केलंच पाहिजे..' अभिनेत्री ईशा केसकरचं बेधडक वक्तव्य चर्चेत, काय म्हणाली?
'भूमिकेसाठी कपडे काढणं गरजेचं असेल तर ते केलंच पाहिजे..' अभिनेत्री ईशा केसकरचं बेधडक वक्तव्य चर्चेत, काय म्हणाली?
Bollywood Actress on Sonam Wangchuk: 'सोनम वांगचूक यांचा स्वतःच्या राजकीय अजेंड्यासाठी करतायत वापर'; लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची बेधडक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
'सोनम वांगचूक यांचा स्वतःच्या राजकीय अजेंड्यासाठी करतायत वापर'; लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची बेधडक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
Bishnoi Gang Targets Aamir Khan: 'स्टारडमच्या नावाखाली लव्ह जिहाद, श्वासही घ्यायला देणार नाही...'; आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर, सोशल मीडियावर धमकी
'स्टारडमच्या नावाखाली लव्ह जिहाद, श्वासही घ्यायला देणार नाही...'; आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर, जीवेमारण्याची धमकी

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Crime: पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Embed widget