एक्स्प्लोर

युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर

Gold Price Crosses New High in India Mumbai: जागतिक तणावामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सामान्यांना सोनं खरेदी करावे की नाही? असा प्रश्न पडला आहे.

Latest gold and silver price update India: जागतिक राजकारणातील तणाव आणि इराण इस्त्रायल युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका जन सामान्यांना बसत आहे. मौल्यवान धातुंसह गॅसच्या दरातही वाढ झाली आहे. यामुळे सामान्यांचे कंबरडे मोडणार हे निश्चित. सध्या लग्नसराईचा मौसम सुरु आहे.  मेपर्यंत अनेक घरांत सनईचे सुर घुमू लागतील. लग्न म्हटलं सोनं अन् चांदीची खरेदी होतेच.  दरम्यान, जागतिक पातळीवर सुरु असलेल्या युद्धजन्य स्थितीचा थेट फटका सामान्यांच्या खिशाला बसत आहे.  सोन्यासह चांदीच्या दराने उच्चांक गाठला आहे. जागतिक तसेच भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दराने चांगलीच उसळी घेतलीये.

मुंबईत आज सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे.   आज प्रति तोळा सोनं 1 लाख 65 हजार 249 रुपयांनी विकला जात आहे. मुंबईत काल 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 64 हजार 355 रुपये इतका होता. कालच्या तुलनेत आज  सोन्याच्या दराने उसंडी घेतली आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 900 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांसाठी नक्कीच खिशाला कात्री बसणारी ही माहिती म्हणावी लागेल.

दरम्यान, सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीची चमक काही कमी होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. प्रति किलो चांदी 2 लाख 81 हजार 14 रुपयांनी सराफाच्या बाजारात विकली जात आहे.  सोन्यासह चांदीच्याही दरात चकाकी पाहायला मिळत आहे. सोनं महागल्यामुळे काही ग्राहक चांदीकडे वळतात. मात्र, सोनं आणि चांदीच्या दरात होणारी वाढ पाहून ग्राहक चिंतेत पडले आहेत.

गुड रिटर्न्स या वेबसाईटनुसार,  भारतात आज 24 कॅरेट 1 तोळं  सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली आहे.  10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला 1,62,380 रुपये मोजावे लागतील. तर, 24 कॅरेट 10 तोळं सोन्याच्या दरामागे 7000 रुपयांची वाढ झाली आहे. 100 ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला 16,23,800 रुपये मोजावे लागतील.

22 कॅरेट 1 तोळं सोन्याच्या दरात 650 रुपयांची वाढ झाली आहे.  10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला 1,48,850 रुपये मोजावे लागतील.  तर, 22 कॅरेट 10 तोळं सोन्याच्या दरात 6,500 रुपयांची वाढ झाली आहे.  100 ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला 14,88,500 रुपये मोजावे लागतील. 

18 कॅरेट  सोन्याच्या दरानेही उच्चांकी गाठली आहे. 18 कॅरेट 1 तोळं सोन्याच्या दरात 530 रुपयांची वाढ झाली आहे.  10 ग्रॅम  सोनं खरेदीसाठी आपल्याला 1,21, 790 रुपये मोजावे लागतील. तर, 18 कॅरेट  10 तोळं सोन्याच्या दरात  5,300 रुपयांची वाढ झाली आहे.  100 ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला 12,17,900 रुपये मोजावे लागतील. 

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

Embed widget