एक्स्प्लोर
'हनिमूनच्या फोटोमध्ये विकी कुठंय? कतरिनाच्या मालदीवमधील फोटोंवर नेटकऱ्यांच्या कमेंटचा पाऊस
katrina
1/6

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला.
2/6

कतरिना आणि विकी एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करतात. नुकताच कतरिनानं तिचा मालदीवमधील फोटो शेअर केला. या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
3/6

कतरिनाने तिचा मालदीवमधील फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'माय हॅप्पी प्लेस'. या फोटोमध्ये कतरिना डार्क ग्रीन कलरचा शर्ट आणि व्हाईट प्रिंटेड शॉर्ट्स अशा लूकमध्ये दिसत आहे.
4/6

या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हनिमूनच्या फोटोमध्ये विकी कुठंय? ' तर दुसऱ्यानं कमेंट केली, 'क्विन ऑफ मिलियन हार्ट्स'
5/6

राजस्थानच्या बरवारा येथील सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये कतरिना आणि विकीने लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो कतरिना आणि विकीने सोशल मीडियावर शेअर केले होते.
6/6

कतरिना लवकरच 'मेरी ख्रिसमस' आणि 'टायगर 3' या तिच्या आगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Published at : 25 Jan 2022 01:28 PM (IST)
आणखी पाहा























