एक्स्प्लोर
शाहरुख, सलमानचा काळ गेला; आता 'हा' देशातला सर्वात महागडा स्टार, एका फिल्मची फी 300 कोटी
Highest Paid Actor Of India: देशातला सर्वात महागडा अभिनेता तब्बल 300 कोटींचं मानधन घेतो. हा शाहरुख खान नाही आणि सलमान खानही नाही... फीच्या बाबतीत या अभिनेत्यानं बॉलिवूडच्य खान्सना मागे टाकलं आहे.
Highest Paid Actor Of India
1/9

'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'इंडियन 2' पासून अनेक बिग बजेट चित्रपट 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर 200 कोटींची कमाई करण्यात अपयशी ठरले आहेत, परंतु एक स्टार त्याच्या आगामी चित्रपटासाठी 300 कोटी रुपये घेत आहे आणि यामुळेच तो भारतातील हाईएस्ट पेड अभिनेता बनला आहे.
2/9

आम्ही ज्या सुपरस्टारबद्दल बोलत आहोत, तो दुसरा कोणी नसून अल्लू अर्जुन आहे. अल्लू अर्जुन देशातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे.
3/9

ट्रॅक टॉलिवूडच्या ताज्या अहवालानुसार, अल्लू अर्जुननं त्याच्या बहुप्रतिक्षित पुष्पा चित्रपटाचा सीक्वल 'पुष्पा 2: द रुल'साठी 300 कोटी रुपये आकारले आहेत.
4/9

यासह अल्लू अर्जुन आता थलपथी विजयला मागे टाकून भारतातील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता बनला आहे. विजयला थलपथी 69 साठी 275 कोटी रुपये फी देण्यात आल्याची माहिती आहे.
5/9

तेलगू सिनेमाचा सुपरस्टार, अल्लू अर्जुन हा फक्त एक अभिनेता नाही तर, तो एक निर्माता आणि उद्योजक देखील आहे. त्यानं अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुन तेलगू इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.
6/9

अल्लू अर्जुनची अंदाजे एकूण संपत्ती 460 कोटी रुपये आहे आणि तो लग्झरी लाईफ जगतो. अल्लू अर्जुनकडे एक पर्सनल जेट, एक आलिशान बंगला, अनेक मालमत्ता आणि आलिशान कार्सचं कलेक्शन आणि बरंच काही आहे.
7/9

अभिनयाव्यतिरिक्त अल्लू अर्जुन त्याचं प्रोडक्शन हाऊस, रेस्टॉरंट सीरिज, मल्टिप्लेक्स आणि इतर अनेक गुंतवणुकीतून प्रचंड कमाई करतो.
8/9

अल्लू अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, बहुप्रतिक्षित पुष्पा 2 रिलीज होणार आहे. हा चित्रपट 5 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'पुष्पा 2: द रुल'मध्ये रश्मिका मानधना आणि फहद फासिल यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ते दोघेही श्रीवल्ली आणि भंवर सिंह शेखावत यांच्या भूमिका पुन्हा करताना दिसणार आहेत. ॲक्शन ड्रामा चित्रपटातील नव्या आयटम गर्ल म्हणून श्रीलीलानं समंथा रुथ प्रभूची जागा घेतली आहे.
9/9

सुकुमार दिग्दर्शित आणि Mythri Movie Makers निर्मित, पुष्पा 2 मध्ये प्रकाश राज, जगपती बाबू, अनसूया भारद्वाज आणि जगदीश प्रताप बंदरी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. पहिल्या दिवशी 275 कोटींची कमाई करून हा चित्रपट जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल अशी अपेक्षा आहे.
Published at : 13 Nov 2024 12:15 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























