एक्स्प्लोर
Shilpa Shetty : खटल्यातून आरोपमुक्तीसाठी शिल्पा शेट्टीची हायकोर्टात याचिका
Shilpa Shetty : खटल्यातून आरोपमुक्तीसाठी शिल्पा शेट्टीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
Shilpa Shetty
1/10

रिचर्ड गिअरसोबत एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या 'किस'मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिल्पा शेट्टीनं याप्रकरणातून आरोपातूनमुक्त करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
2/10

शिल्पानं याबाबतील कनिष्ठ न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळून लावल्यानंतर शिल्पानं त्या निर्णयाला आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
3/10

न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांच्यासमोर नुकतीच यावर सुनावणी झाली.
4/10

साल 2007 च्या घटनेचा तो व्हिडिओ पाहिल्यास शिल्पाचा कोणतंही अश्लिल कृत्य करण्याचा हेतू नव्हता.
5/10

साल 2007 मध्ये एड्स जनजागृतीसाठी राजस्थानमधील एका जाहीर कार्यक्रामात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गिअर उपस्थित होते.
6/10

या कार्यक्रमा दरम्यान, गिअरनं अचानकपणे शिल्पाला जवळ ओढत सर्वांसमोर किस केलं होतं.
7/10

आपल्यासाठी हे सारं अनपेक्षित असल्याचं शिल्पानं जाहीर स्पष्टीकरण दिलं होतं.
8/10

त्यानंतर शिल्पा शेट्टीवर अश्लिलता आणि असभ्यता पसरविल्याचा आरोप करत जयपूर, अलवर आणि गाझियाबाद इथं स्वतंत्र फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.
9/10

राजस्थान न्यायालयानं शिल्पा आणि गिअरविरोधात अटक वॉरंटही जारी केले होते.
10/10

त्यानंतर शिल्पाच्या विनंतीवरून हे प्रकरण राजस्थानमधील न्यायालयाकडून मुंबई दंडाधिकारी न्यायालयात वर्ग करण्यात आलं.
Published at : 09 Jan 2023 06:44 PM (IST)
आणखी पाहा























