एक्स्प्लोर
Oscars 2023: ऑस्कर-2023 मध्ये भारताचा डंका; पाहा पुरस्कार सोहळ्यातील खास क्षण
आरआरआर (RRR) या चित्रपटाच्या टीमचं तसेच द एलिफंट विस्परर्स (The Elephant Whisperers) या डॉक्युमेंट्रीच्या टीमचं जगभरातील लोक कौतुक करत आहेत.
(RRR Movie/Twitter)
1/7

यंदाचा ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळा हा भारतीयांसाठी खास ठरला आहे. 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्यानं बेस्ट ओरिजनल सॉन्ग कॅटेगरीमधील ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे.
2/7

संगीतकार एम एम किरावाणी आणि गीतकार चंद्रबोस यांनी नाटू नाटू गाण्याला मिळालेला बेस्ट ओरिजनल सॉन्ग कॅटेगरीमधील ऑस्कर पुरस्कार स्टेजवर जाऊन स्विकारला. (RRR Movie/Twitter)
3/7

'नाटू नाटू' गाण्याच्या परफॉर्मन्सने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांची मनं जिंकली. (RRR Movie/Twitter)
4/7

काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांचा परफॉर्मन्स झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्यांना 'स्टँडिंग ओव्हेशन' मिळाले. (RRR Movie/Twitter)
5/7

राम चरणनं ऑस्कर ट्रॉफीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. (Jr NTR/Twitter)
6/7

गुनीत मोगाने द एलिफंट विस्परर्स (The Elephant Whisperers) या माहितीपटाची निर्मिती केली. द एलिफंट विस्परर्स या डॉक्युमेंट्रीनं ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर गुनीतनं सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला. (RRR Movie/Twitter)
7/7

एम एम किरावाणी आणि चंद्रबोस यांचा ऑस्कर ट्रॉफीसोबतचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमध्ये दोघेही आनंदी दिसत आहेत. (RRR Movie/Twitter)
Published at : 13 Mar 2023 11:36 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















