एक्स्प्लोर
Soha Ali Khan Fitness : सोहा अली खान रोज सकाळी 'हे' रिकाम्या पोटी खाते, जाणून घ्या
Soha Ali Khan Fitness : सोहा अली खान इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत म्हणाली, ती रोज सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाते आणि त्याचे आरोग्यदायी फायदे सांगते.
Soha Ali Khan Fitness Tips
1/12

बॉलीवूड अभिनेत्री सोहा अली खान ही आपल्या सौंदर्यामुळे आणि फिटनेससाठी ओळखली जाते. ती प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानची बहीण असून पटौदी घराण्याची राजकन्या आहे.
2/12

सोहा अली खान ही बॉलीवूड अभिनेत्री सध्या ४७ वर्षांची आहे आणि तिचे वय पाहून कोणीही सहज विश्वास ठेवणार नाही.
3/12

ती सोशल मीडियावर नेहमी आरोग्यविषयक माहिती शेअर करत असते.
4/12

अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर आपल्या सकाळच्या सवयीबद्दल एक पोस्ट करत म्हणाली, की ती रोज सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाते.
5/12

सोहा हे देखील म्हणाली की, ही सवय मागील चार आठवड्यांपासून पाळत आहे.
6/12

ती म्हणाली की कच्चा लसूण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारण लसूण आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
7/12

पोटाची कार्यक्षमता सुधारतो आणि सूज कमी करतो. लसणामध्ये असलेला 'अॅलिसिन' नावाचा कंपाऊंड जादूई मानला जातो.
8/12

सोहा लसणाची एक छोटी कळी चावून खाते. ती जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा ते चावते.
9/12

नंतर ती पाण्याबरोबर ते गिळते. ती सांगते की ज्यांना चावणे अवघड वाटते त्यांनी लसूण ठेचून खाऊ शकता.
10/12

तसेच हे सर्वांसाठी योग्य नाही असे तिने स्पष्ट केले. कारण रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा वापर करणाऱ्यांनी याची काळजी घ्यावी.
11/12

सोहाने लसणाच्या वासाबद्दल उपायही सांगितला. ती म्हणाली, लसूण खाल्ल्यानंतर दात नीट घासा आणि माउथवॉश वापरा.
12/12

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Published at : 30 Oct 2025 02:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















