एक्स्प्लोर
Zombivali : मराठीतला पहिला ‘झोम्बी’पट, ‘झोंबिवली’ला मिळतेय प्रेक्षकांची पसंती!
Zombivali
1/6

'झोंबिवली' (Zombivali) हा या संकल्पनेवर आधारीत मराठीतील पहिला हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. मराठीत पहिल्यांदाच 'झोम्बी'वर आधारित चित्रपट आला असून, त्याचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेलं आहे. (PC: Instagram)
2/6

या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट बुधवारी (26 जानेवारी) राज्यभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. (PC: Instagram)
3/6

मराठीतल्या पहिल्यावहिल्या झोम्बी’पटाला प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटगृहांमध्ये चांगलीच वर्दळ पाहायला मिळाली. (PC: Instagram)
4/6

जुलै 2020 मध्ये सारेगामाने 'झोंबिवली' या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. कोरोना निर्बंधातून काहीशी सूट मिळाल्यावर 26 जानेवारी 2022ला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. (PC: Instagram)
5/6

या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर, तृप्ती खामकर, जानकी पाठक आणि वैदेही परशुरामी मुख्य भूमिकेत आहेत. (PC: Instagram)
6/6

काहीसा हॉरर आणि तितकाच धमाल उडवून देणारा 'झोंबिवली' चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपटामधील काही सीन भीतीदायक वाटतात, तर काही संवाद मात्र हसायला भाग पाडतात. (PC: Instagram)
Published at : 27 Jan 2022 04:03 PM (IST)
आणखी पाहा























