गंगूबाई काठियावाडी चित्रपटचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची मुख्य नायिका बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt ) चांगलीच चर्चेत आहे. (photo: aliabhatt/ig)
2/7
सोशल मीडियावर आलिया भट्टच्या या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावरच घेतले आहे. या चित्रपटातील व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तिने खूप मेहनत घेतल्याचेही अलियाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे. यासोबतच तिने आपल्या पुढील दहा वर्षाच्या करिअरबद्दलही सांगितले आहे. (photo: aliabhatt/ig)
3/7
आलिया भट्टने नुकतीच फिल्म कम्पॅनियनला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान तिने अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. त्यामध्येच तिने पुढील दहा वर्षांच्या करिअरबद्दलही सांगितले आहे. (photo: aliabhatt/ig)
4/7
आलिया भट्टने मुलाखतीत सांगितले की, 'जर मी निर्माती झाली आणि मला चांगले पैसे मिळाले तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. परंतु, ही गोष्ट फक्त पैशासाठी नाही तर माझ्या टॅलेंटला सपोर्ट मिळेल अशा ठिकाणी मला पोहोचायचं आहे. हे फक्त माझ्या टॅलेंटला प्रोत्साहन देण्यासाठी नाही तर मी इतरांच्याही टॅलेंटला प्रोत्साहन देऊ शकेन यासाठी करायचं आहे. (photo: aliabhatt/ig)
5/7
आलिया सांगते, "मला सतत असे वाटायचे की, जे लोक क्रिएटिव्ह प्रोडक्शनचा भाग आहेत, अशा लोकांपैकी मी एक का असू शकत नाही? एक प्रोजेक्ट क्रिएटिविटीने करणं, दिग्दर्शक आणि लेखकाला सोबत घेणं, नेहमीच चित्रपटात अभिनय करायचा नाही, हेच मला करायचं आहे. पुढील दहा वर्षांत मला माझे प्रोडक्शन हाऊस बनवायचे आहे, अशी योजना आलियाने सांगितली आहे. (photo: aliabhatt/ig)
6/7
आलिया भट्ट 'डार्लिंग्स'मधून निर्माती म्हणून डेब्यू करणार आहे. (photo: aliabhatt/ig)
7/7
'डार्लिंग' हा एक डार्क कॉमेडी सिनेमा आहे. यामध्ये आई आणि मुलीचे नाते दाखवण्यात आले आहे. (photo: aliabhatt/ig)