एक्स्प्लोर
कलाविश्वाला मोठा धक्का! अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, 'या' मालिकेमधून घ्यावा लागला हेल्थ ब्रेक
प्रियाच्या निधनामुळे मराठी रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर शोककळा पसरली आहे. अल्पावधीतच तिने केलेला अभिनय, तिचा उत्साह आणि मनमोकळेपणा प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील.
Priya Marathe Passes Away
1/6

मराठी आणि हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणारी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन झालं आहे.
2/6

वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देत आज (रविवार) पहाटे चार वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाने मराठी तसेच हिंदी कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
3/6

‘पवित्र रिश्ता’, ‘साथ निभाना साथियाँ’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ यांसारख्या मालिकांमधून प्रियाने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.
4/6

मराठी प्रेक्षकांमध्ये ती घराघरात पोहोचली आणि तिच्या अभिनयकौशल्याची छाप सर्वांनाच जाणवली.
5/6

प्रिया शेवटची ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत दिसली होती. मात्र, शूटिंगदरम्यान तब्येतीच्या कारणास्तव तिला मालिका सोडावी लागली होती. याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियावर दिली होती.
6/6

गेल्या काही महिन्यांपासून प्रिया कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसली नाही. सोशल मीडियावरही तिची अनुपस्थिती जाणवत होती. अचानक तिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांबरोबरच तिच्या सहकलाकारांनाही धक्का बसला आहे.
Published at : 31 Aug 2025 10:44 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























