नोकरदार वर्गासाठी टीडीएस (Tax Deducted at Source) हा शब्द नाही. अनेकांचे वार्षिक उत्पन्न करपात्र नसते. तरीदेखील त्यांचा टीडीएस दर महिन्याला कापला जातो. कंपनीला एका ठाराविक मुदतीत आपल्या कर्मचाऱ्यांचा टीडीएस कापवा लागतो. त्यामुळे करपात्र उत्पन्न नसताना या कर्मचाऱ्यांच्या पगारातून टीडीएस कापला जातो.
2/6
पगारदार कर्मचाऱ्यांच्या वेतनातूनही टीडीएस कापला जातो. या कर्मचाऱ्यांना आपल्या गुंतवणुकीची माहिती सादर करावी लागते. ही माहिती न दिल्यास कंपनीकडून नियमांनुसार, टीडीएस कापला जातो.
3/6
टीडीएस कापला गेला म्हणजे तुमचे पैसे गेले असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न भरून अधिक प्रमाणात कापला गेलेला टॅक्स रिफंड म्हणून परत मिळवू शकता.
4/6
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी आयकर विभागाचे पोर्टल सुरू आहे. आयकर भरण्यासाठी 31 जुलै 2022 ही मुदत आहे. आयकर परतावा भरल्यानंतर तुम्हाला रिफंड मिळू शकेल.
5/6
टीडीएस रिफंड मिळवण्यासाठी तुम्ही 31 जुलै 2022 पर्यंत इनकम टॅक्स रिटर्न फाइल करा. इनकम टॅक्स रिटर्न दाखल करताना टीडीएस रिफंडबाबत नमूद करा. त्यानंतर तुम्हाला टीडीएस म्हणून कापले गेलेले तुमचे पैसे तुमच्या खात्यात येतील. त्याशिवाय, कापला गेलेला टीडीएस मिळवण्यासाठी तुम्हाला 15 जी फॉर्म बँकेकडून बँकेत जमा करू शकता. त्यानंतर टीडीएसचे पैसे रिफंड मिळू शकतात.
6/6
दरम्यान, आयकर खात्याने इनकम टॅक्स फाइलिंगबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी 'ई-निवारण' (e-Nivaran) पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर तुम्ही तक्रार दाखल करू शकता.