एक्स्प्लोर
Gold Rate Today : सोन्या-चांदीला झळाळी; प्रतितोळा सोन्याचा दर 57 हजारांच्याही पुढे
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,190 रूपयांवर आला आहे.

Gold Rate Today
1/9

चीनमधील वाढता कोरोना संसर्ग आणि जागतिक मंदीची भीती तसेच, जागतिक बाजारात डॉलरमध्ये झालेली वाढ या कारणामुळे सोन्या-चांदीचे दर वाढतायत.
2/9

आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे.
3/9

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,190 रूपयांवर आला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 52,424 रूपयांवर आहे.
4/9

आज चांदीच्या दराने मात्र मोठी उच्चांक पातळी गाठली आहे. तब्बल 500 रूपयांच्या वाढीसह आज एक किलो चांदीचा दर 68,810 रूपये आहे.
5/9

भारतात पौष महिना सरताच लग्नसराईला सुरुवात होते. मात्र, सोन्याच्या दरात झालेली वाढ ग्राहकांना परवडत नाहीये.
6/9

यासाठी अनेक ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी मुरड घातली आहे. तर, काहींनी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.
7/9

जळगावच्या सुवर्णनगरीतही सोन्याचे दर 58 हजारांच्या पुढे गेले आहेत.
8/9

BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. याद्वारे तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता.
9/9

इंडियन बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.
Published at : 26 Jan 2023 12:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
