एक्स्प्लोर

Actress Lives In 100 Year Old Bungalow: 100 वर्ष जुन्या आलिशान बंगल्यात राहते सैफ अली खानची 'ही' हिरोईन; शाहरुखच्या मन्नतपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर हिचं घर!

Actress Lives In 100 Year Old Bungalow: फराह खाननं डायनाच्या घराची झलकही प्रेक्षकांना दाखवली आणि त्यासोबत तब्बल 100 वर्ष जुन्या असलेल्या या घराबाबतच्या काही ऐतिहासिक गोष्टीही सांगितल्या. 

Actress Lives In 100 Year Old Bungalow: फिल्म प्रोड्यूसर फराह खानचा (Farah Khan) व्हीव्लॉग सध्या भलताच चर्चेत आहे. अलिकडेच फराह खाननं तिच्या व्हीलॉगमध्ये बॉलिवूड अभिनेत्री डायना पेंटीच्या (Actress Diana Penty) 100 वर्ष जुन्या मुंबईतील (Mumbai News) घराला भेट दिली आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला. फराह खान थक्क झाली, इतकी की, फराह खान डायनाच्या जुन्या घराची तुलना शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) मन्नतसोबत करताना जराशीही अडखळली नाही. फराहचं हे वाक्य ऐकून डायना आपलं हसू अजिबात आवरू शकली नाही. व्हीलॉगच्या नव्या भागात फराह खानसोबत तिचा स्वयंपाकी दिलीपही तिच्यासोबत होता. फराह खाननं डायनाच्या घराची झलकही प्रेक्षकांना दाखवली आणि त्यासोबत तब्बल 100 वर्ष जुन्या असलेल्या या घराबाबतच्या काही ऐतिहासिक गोष्टीही सांगितल्या. 

फराह खान संपूर्ण घर थक्क होऊन पाहत होती. ती म्हणाली की, "प्लीज मला तुझं घर दाखव... हे कोणतं ठिकाण आहे? मला असं वाटतंय की, मी काळाच्या मागे जाऊन कोणत्यातरी वेगळ्याच काळातील घरात पोहोचले आहे..." काचेची नक्षी असलेलं लाकडाचं टेबल पाहून तिनं उत्साहानं विचारलं की, "हे किती जुनं आहे?" डायनाच्या आईनं उत्तर दिलं, "100 वर्षांहून अधिक जुनं आहे..."

डायनाचं 100 वर्ष जुनं घर पाहून फराह खान थक्क (Diana Penty Lives In 100 Year Old Bungalow)

यावर प्रतिक्रिया देताना फराह म्हणाली की, "हे 100 वर्षांहून अधिक जुनं आहे. म्हणजे, माझ्यापेक्षाही जुनं! मी अशा जागेवर येऊन खूप खूश आहे, जिथे गोष्टी माझ्यापेक्षाही जुन्या आहेत... अशा ठिकाणी असल्याचा मला खूप आनंद आहे..."

जेव्हा फराह स्वयंपाकघरात पोहोचली, तेव्हा तिला तिचा आनंद लपवताच आला नाही... ती म्हणाली, "वाह! हे स्वयंपाकघर पाहा, ते अद्भुत आहे!" तिच्या स्वयंपाकी दिलीपकडे वळून तिनं विचारलं, "तू कधी इतकं सुंदर घर पाहिलंय का?" दिलीप हसला आणि म्हणाला, "नाही, मॅडम, कधीच नाही..."

यावर डायना म्हणाली, "माझं बाहेर एक शेत आहे..." ज्यावर फराह म्हणाली की, "किती सुंदर! मला असं वाटतं की, मी वेगळ्या ठिकाणी आली आहे... हे मुंबईसारखे अजिबात वाटत नाही..." त्यानंतर फराहनं विचारलं की, ती या घरात कधीपासून राहतेय. डायना म्हणाली, "अगदी 100 वर्षांपूर्वी, माझ्या पणजोबांच्या काळापासून... मी या घरात राहणारी चौथी पिढी आहे..."

फरह खानकडून डायनाच्या घराची शाहरुखच्या मन्नतसोबत तुलना (Farah Khan Compares With Shahrukh Khan Mannat)

फराह खान डायना पेंटीचं घर पाहून खूप प्रभावित झाली. एका जागेबद्दल बोलताना फराह म्हणाली, "लोखंडवाला इथला डान्स स्टुडिओही इतका मोठा नाही! तो शाहरुख खानच्या मन्नत लिविंग रूमइतका मोठा आहे...." घर पाहून फराह खान करत असलेलं कौतुक आणि तिचे शब्द ऐकून डायना पेंटी स्तब्ध झाली आणि तिनं असहमती दर्शवली, पण फराह खान पुन्हा पुन्हा तेच म्हणत होती. फराह म्हणाली, "शाहरुख खानला इथे आमंत्रित करायला हवं." डायना हसली आणि म्हणाली, "मला इथे शाहरुखला पहायला आवडेल..."

डायनाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, डायना पेंटीनं कॉकटेलमधून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं, ज्यामध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण देखील होते. त्यानंतर तिनं हॅपी भाग जायेगी, परमाणु: द स्टोरी ऑफ पोखरण, हॅपी फिर भाग जायेगी आणि सॅल्यूट सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. ती अलीकडेच डिटेक्टिव्ह शेरदिलमध्ये दिसली, ज्यामध्ये दिलजीत दोसांझ, बोमन इराणी, चंकी पांडे आणि बनिता संधू देखील आहेत. डायना शेवटची अमेझॉन प्राइम व्हिडिओ शो 'डू यू वॉना पार्टनर'मध्ये दिसलेली, ज्यामध्ये तमन्ना भाटिया आणि नीरज काबी देखील होते. या सीरिजचा प्रीमियर 12 सप्टेंबर रोजी प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झालेला.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bollywood Suspense Thriller Movie: 169 मिनिटांची 23 वर्षांपूर्वीची सस्पेन्स थ्रिलर फिल्म, 'दृष्यम'ला लाजवणारा सस्पेन्स, ट्विस्ट पाहून लागेल 440 वॅटचा झटका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Hardik Pandya :  हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे दर जाणून घ्या
Embed widget