एक्स्प्लोर

Maharashtra Politics BJP: चांद्यापासून बांद्यापर्यंतचे नेते भाजपमध्ये निघाले, शत प्रतिशतच्या दिशेने दमदार पाऊल, कोणकोणते नेते कमळ हातात घेणार?

BJP in Maharashtra: गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात भाजपची ताकद वाढल्यामुळे आता आपल्याला कोणत्याही कुबड्यांची गरज नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नुकतेच केले होते.

Beed news Badamrao Pandit: बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री बदामराव पंडित यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला. मंत्री पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) उपस्थितीत पंडितांचा पक्षप्रवेश झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडच्या गेवराई मतदार संघातील ही मोठी घडामोड आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांच्या विरोधात मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या माध्यमातून बदामराव पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांना बळ देण्यात येत आहे.

पंकजा मुंडेंच्या आदेशाने लक्ष्मण पवार आणि बदामराव पंडित एकत्र काम करणार असल्याचे पंडित यांनी म्हटलं. तर यावेळी बदामराव पंडित यांनी पुतणे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर जोरदार टीका केली. जन्मल्यापासून आम्ही कट्टर विरोधक आहोत. विजयसिंह पंडित अपघाताने आमदार झाले असून पैसे वाटून आमदार झाले. गेवराईची जनता मलाच आमदार मानते. विजयसिंह पंडित कोणत्याही कामात नसतात. त्यांचे बंधूच सर्व काम पाहतात असं म्हणत बदामराव पंडित यांनी विजयसिंह पंडित यांना लक्ष केले. तर यावेळी भविष्यात भाजपाची राष्ट्रवादीसोबत युती होणार नाही. त्यामुळे भाजपाकडून गेवराई विधानसभेची निवडणूक मीच लढवणार, असा दावा बदामराव पंडित यांनी केला.

Badamrao Pandit: बदामराव पंडित यांची राजकीय कारकीर्द

* बदामराव पंडित गेवराई विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत 
* 1995, 1999 आणि 2009 यादरम्यान पंडित आमदार होते 
* 2024 च्या निवडणुकीत पुतणे विजयसिंह पंडित यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला 
* 1999 दरम्यान दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून बदामराव पंडित राज्यमंत्री झाले 
* तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी दरम्यान मंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून बदामराव पंडित यांचा भाजपा प्रवेश झालाय 
* त्यामुळे गेवराई विधानसभा मतदारसंघात महायुती आणि पंडित विरुद्ध पंडित असा संघर्ष निर्माण होणार हे निश्चित झाले आहे

Solapur News: सोलापूरमध्ये दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मोहोळ आणि माढा तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांचे आज भाजप प्रवेश होणार आहेत. दोन माजी आमदारासह सोलापुरातील शेकडो स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा होणाऱ्या भाजप प्रवेशामुळे महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिंदे गटालाच फटका बसणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने यांच्यासह लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्यासह मोहोळ तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शेकडो  कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

तर मोहोळ तालुक्यातील शिंदेच्या शिवसेनेचे नेते, विधानसभा निवडणुकीचे उमेदवार राहिलेले नागनाथ क्षीरसागर आणि युवा नेते सोमेश क्षीरसागर हे देखील पक्षाला सोडचिट्टी देऊन पाच वर्षानंतर भाजपमध्ये घरवापसी करतायत. तर इकडे माढाचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव, दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह शिंदे आणि विक्रमसिंह शिंदे यांचा देखील आजच भाजप प्रवेश होणार आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मागील आठवड्यात शिंदे बंधुची भेट घेऊन मन धरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शिंदे बंधू अजित पवार गटाला सोडचिट्टी देण्याच्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर असताना आज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ आणि माढा तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होत आहे. मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे प्रवेश होणार आहेत


Solapur Politics: सोलापूरमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची यादी


मोहोळ तालुका

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)

1) श्री. राजनजी पाटील – माजी आमदार, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकार परिषद (राज्य मंत्री दर्जा)

2) श्री. यशवंत माने – माजी आमदार मोहोळ विधानसभा मतदार संघ

3) श्री. विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील – चेअरमन लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखानाआणि माजी उपाध्यक्ष, जि.प. सोलापूर

4) श्री. अजिंक्यराणा पाटील – माजी प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी संघटना

5) श्री. प्रकाश चवरे – तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मोहोळ

6) श्री. दीपक माळी – उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहोळ

7) श्री. अस्लम चौधरी – जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सोलापूर

8) श्री. भारत सुतकर – संचालक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

9) श्री. धनाजी गावडे – सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती ,मोहोळ

10) श्री. प्रशांत बचुटे – उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मोहोळ

11) श्री. जालिंदर भाऊ लांडे– माजी कृषि सभापती जि. प. सोलापूर

12) श्री. सज्जनराव पाटील – सदस्य, सोलापूर जिल्हा नियोजन समिती

13) श्री. प्रमोद डोके – उपनगराध्यक्ष मोहोळ नगरपरिषद

14) श्री. ऍड. राजाभाऊ गुंड पाटील – उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

15) श्री. कुंदन धोत्रे– उपाध्यक्ष मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

16)सौ. रत्नमाला पोतदार – सभापती पंचायत समिती मोहोळ

17) सौ. जोत्स्ना पाटील – उपाध्यक्षा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला

18) सौ. सिंधुताई वाघमारे – तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महिला मोहोळ

19) सौ यशोदा कांबळे – शहर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मोहोळ

20) श्री. राहुल मोरे – अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहोळ विधानसभा मतदार संघ

21) श्री. बाळासाहेब भोसले – अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहोळ विधानसभा मतदार संघ

22) श्री. विश्वजीत गोविंद पाटील – तालुका अध्यक्ष विद्यार्थी संघटना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

 
शिवसेना (शिंदे गट)

1) श्री. नागनाथ दत्तात्रय क्षीरसागर – 247 (अ.जा.) मोहोळ विधानसभा, शिवसेना अधिकृत उमेदवार (2019)

2) श्री. सोमेश नागनाथ क्षीरसागर – युवा नेते, शिवसेना, सोलापूर

Raigad Politics: रायगडमध्ये ठाकरे गटाला खिंडार

शिवसेना ठाकरे गटाचे माजी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांच्यासह महाड, पोलादपुर, माणगावमधील असंख्य पदाधिकारी यांनी  ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये प्रवेश केलाय.भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थित मुंबई येथे हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला त्यामुळे रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा ठाकरे गटाला खिंडार पडलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर रायगडमध्ये ठाकरे गटाला हा  धक्का असू शकतो तर भाजपची ताकद वाढल्याचे पहायला मिळत आहे.

आणखी वाचा

BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, 60 पेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना उमेदवारी नाही, नव्या चेहऱ्यांना संधी 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
Dhananjay Munde: आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
Dhananjay Munde: आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Eknath Shinde Drugs: एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये 145 कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडलं, एसपी तुषार दोशींनी माहिती लपवली, सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये 145 कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडलं, सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
Embed widget