एक्स्प्लोर
FPI: दिवाळीपूर्वी भारतासाठी गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, तीन महिन्यानंतर शेअर बाजारात मोठी गुंतवणूक
FPI : भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी जुलै ते सप्टेंबर महिन्यात पैसे काढून घेतले होते. मात्र, ऑक्टोबर महिन्यात हे चित्र बदललं आहे.
विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला
1/6

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय शेअर बाजारातून गेल्या तीन महिन्यांमध्ये सलग पैसे काढून घेतले होते. मात्र, ऑक्टोबर महिन्यात विदेशी संस्थात्मक गुंतवणकदार खरेदीदार बनले आहेत. त्यांनी आतापर्यंत शेअर खरेदीद्वारे 6480 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
2/6

विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी केली याचं कारण मजबूत मॅक्रोइकोनॉमिक फॅक्टर असल्याचं सांगितलं. डिपॉजिटरीच्या आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी सप्टेंबरमध्ये 23885 कोटी रुपये काढून घेतले होते. तर, ऑगस्टमध्ये ही रक्कम 34990 कोटी रुपये होती. जुलै महिन्यात ही रक्कम 17700 कोटी रुपये आहे.
3/6

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 2025 मध्ये आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून दीड लाख कोटी रुपये काढले आहेत. या दरम्यान बाँड बाजारात 17 ऑक्टोबरपर्यंत 5332 कोटी रुपये सामान्य मर्यादेत आणि वॉलंटरी रिटेंशन नुसार 214 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
4/6

ऑक्टोबर महिन्यात शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी नव्यानं केलेल्या गुंतवणुकीनं मोठ्या बदलाचे संकेत मिळतात. भारतीय बाजाराबाबत जागतिक गुंतवणूकदारांमध्ये नव्या विश्वासाला दर्शवते.
5/6

मॉर्निंगस्टार इन्वेस्टमेंट रिसर्च इंडियाचे हिमांशु श्रीवास्तव यांच्या मते बाकी उभरत्या बाजाराच्या तुलनेत भारताचा मॅक्रोचा बॅकड्रॉप मजबूत आहे. स्थिर विकास, महागाई चं व्यवस्थापन करणे, देशातंर्गत मागणी वाढल्यानं विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 19 Oct 2025 09:18 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























