एक्स्प्लोर
Gold Rate : सोन्याचे दर 13000 रुपयांनी घसरले, दर कमी होण्याचं नेमकं कारण काय?खरेदी करावं का? तज्ज्ञ म्हणतात...
Gold Rate Update : सोन्याचे दर उच्चांकावरुन तब्बल 13000 रुपयांनी घसरले आहेत. या घसरणीमुळं सोने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सोने दर
1/5

सोने दरात गेल्या 10 महिन्यांपासून जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. जागतिक स्तरावर सोन्याचे दर मोठ्या प्रमाणावर ढाले. मात्र, जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांमधील जोखीम भावना कमी झाल्यानं आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबत मिळत असलेल्या नव्या संकेतांमुळं मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर घसरले आहेत. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं उच्चांकाच्या तुलनेत 13000 रुपयांनी कमी होऊन 120000 रुपयांवर पोहोचलं.
2/5

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार करार होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळं सोने आणि चांदीची मागणी कमी झाली आहे. सोने चांदीचे दर वाढले असताना काही गुंतवणूकदारांनी नफा वसुली सुरु केली. त्यामुळं सोने दरातील तेजीला ब्रेक लागला.
3/5

व्हीटी मार्केटसचे ग्लोबल स्ट्रॅटेजी लीड रॉस मॅक्सवेल यांनी बाँड यील्डसमध्ये वाढ झाल्यानं आणि भूराजनैतिक तणाव कमी झाल्यानं सोन्याकडील आकर्षण कमी झालं. ज्यामुळं गुंतवणूकदारांनी नफा वसूल करणं सुरु केलं दर जरी घसरले असले तरी सोन्याचे दर 50 टक्के अधिक आहेत. केंद्रीय बँकांकडून सुरु असलेली मोठी खरेदी, राजकोषीय तोट्यासंदर्भातील चिंता, चलन जोखीम आणि जागतिक अनिश्चितता यामुळं सोने दर वाढले.
4/5

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणासंदर्भातील बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या बुधवारी फेड रिझर्व्हचे रेट जारी होणार आहेत. फेडकडून 25 बेसिस पॉईंटची कपात होण्याचा अंदाज आहे.रॉक्स मॅक्सवेल यांच्या मतानुसार सोन्याचा बाजार अस्थिरतेच्या काळात संपत्तीचं संरक्षण करणे आणि महागाईपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित पर्याय बनला आहे. फेडनं दर कपातीचे संकेत दिल्यास सोन्यातील तेजी पुन्हा वाढू शकते, असा अंदाज आहे.
5/5

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विश्लेषक मानव मोदी यांनी अमेरिका-चीन व्यापार कराराची शक्यता वाढल्यानं सोन्याच्या दरावरील दबाव थोड्या कालावधीसाठी कायम राहू शकतो. मात्र, बाजाराला फेडकडून 25 बेसिस पॉईंटच्या कपातीचा अंदाज आहे, असं ते म्हणाले. दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून सोने चांगला पर्याय असल्याचं रॉक्स मॅक्सवेल यांनी म्हटलं.
Published at : 28 Oct 2025 10:46 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























