एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Morning Prime Time Superfast News : सुपरफास्ट बातम्या : 9.30 AM : 29 OCT 2025 : ABP Majha
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. बोगस मतदार यादीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. 'आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे पप्पू बनू नये', असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. दुसरीकडे, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना 'Anaconda' संबोधल्यानंतर राजकारण तापले आहे, ज्यावर शिंदे गट आणि भाजपने 'अजगर' आणि 'आयत्या बिळावरचा नागोबा' असे प्रतिउत्तर दिले.
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुका महायुतीतच लढण्याचे आदेश दिले असताना, दुसरीकडे सिल्लोडमध्ये शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. सिल्लोडमध्ये पंचायत समितीच्या बंद क्वार्टरच्या पत्त्यावर ५१० मतदार दाखवल्याचा आरोप भाजपनेच शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर केला आहे. याशिवाय, धाराशिवमध्येही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या तक्रारीनंतर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मतदारसंघातील ११७ कोटींच्या कामांना स्थगिती मिळाल्याने महायुतीतील संघर्ष समोर आला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
पुणे
पुणे
Advertisement
Advertisement


















