Maharashtra Live blog: बच्चू कडू नागपुरात आंदोलन करण्यावर ठाम; सरकारची विनंतीही धुडकावली
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog: बच्चू कडू यांचे आंदोलन सुरूच. महामार्ग अजून ही रोखून धरले आहे. कालची रात्र बच्चू कडू आणि आंदोलकांनी जामठा येथे महामार्गावर काढली आहे.. कालच्या तुलनेत गर्दी कमी झाली असली तरी शेकडो ट्रॅक्टर आणि वाहनांसह आंदोलन महामार्ग रोखून बसले आहे.. आज 12 वाजेपर्यंतचे अल्टिमेटम बच्चू कडू यांनी दिले आहे.. त्यानंतर रेल्वे रोकोचा इशारा दिला आहे.बच्चू कडू यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी , वामनराव चटप , मा. मंत्री महादेव जानकर नागपूर येथे आंदोलनस्थळी शेत-यांच्यासोबत रात्रभर रस्त्यावरच झोपले.
Bacchu Kadu Farmer Protest : कार्यकर्ते अडवले, बच्चू कडू संतापले; सरकारला थेट इशारा
नागपूरमध्ये (Nagpur) प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात शेतकरी (farmers), शेतमजूर (farm laborers), दिव्यांग (disabled) आणि मच्छीमारांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन तीव्र झाले आहे. 'आमची माणसं अडवली तर आम्ही रेल्वेकडे जाऊ,' असा थेट इशारा बच्चू कडू यांनी प्रशासनाला दिला आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी, बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले, तर दुसरीकडे, काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने ते संतप्त झाले. आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांच्यासोबत चर्चेची शक्यता वर्तवली जात असताना, सरकारने मागण्या मान्य न केल्यास 'रेल रोको' करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे नागपूरमधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून परिस्थिती तणावपूर्ण आहे
बच्चू कडू यांचे प्रशासनाला आवाहन; विविध ठिकाणी गाड्या अडवल्या त्या प्रशासनाने सोडायला लावाव्या
आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी अडवल्या आहे..
त्या प्रशासनाने सोडायला लावाव्या, बच्चू कडू यांचे प्रशासनाला आवाहन
रेल्वे रुळावर गेलेल्या कार्यकर्त्यांनी रेल्वे अडवू नये..
इथे आपली सरकार सोबत चर्चा सुरू आहे.. तेव्हा रेल्वे अडवून आणखी प्रकरण चिघळू नका...























