एक्स्प्लोर
Amazon Layoffs : आता अमेझॉनमध्ये लेऑफ्सचं वारं, 14000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार, कारण समोर
Amazon Layoffs : ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनमध्ये कर्मचारी कपात सुरु होणार आहे. 14 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं जाणार आहे.
अमेझॉन लेऑफ्स
1/5

अमेझॉन डॉट कॉम आयएनसी या कंपनीकडून कर्मचारी कपातीची आणखी एक फेरी राबवली जाणार आहे. अमेरिकेत ही दुसरी सर्वात मोठी कर्मचारी कपात असेल. कंपनी एआयमधील गुंतवणूक वाढवणार असल्यानं 14000 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं जाईल.
2/5

अमेझॉन कंपनीकडे 1.56 दशलक्ष पूर्णवेळ आणि पार्ट टाईम कर्मचारी गेल्या वर्षीच्या अखेरपर्यंत होते. यापैकी अमेझॉनच्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची संख्या 350000 इतकी आहे.
3/5

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं पहिल्यांदा अमेझॉन 30 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा नियोजन करत असल्याचं म्हटलं. करोनाच्या काळात मागणी वाढल्यानं अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती.
4/5

अमेझॉन कडून त्यांच्याकडील विविध विभागातील मनुष्यबळाची पुनर्रचना काही महिन्यांमध्ये सुरु आहे. यापूर्वी पुस्तक, उपकरणं आणि सेवा विभागातील कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे.
5/5

अमेझॉनचे सीईओ अँडी जेस्सी यांनी जून महिन्यात जनेटिव्ह एआय टूल्सचा वापर सुरु करण्यात आला आहे. यामुळं पुढील काही वर्षात कॉर्पोरेट वर्कफोर्सची संख्या कमी होईल.
Published at : 28 Oct 2025 04:34 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
पुणे
























