एक्स्प्लोर
CRR : सीआरआर म्हणजे काय? बँकिंग व्यवस्थेत 1.16 लाख कोटी रुपये कसे येणार?
यामुळे बँकांच्या कर्जवाटप क्षमता वाढते, गुंतवणुकीला चालना मिळते, आणि अखेर आर्थिक प्रगतीला वेग येतो.
RBI | CRR
1/8

सीआरआर म्हणजे रोख राखीव गुणोत्तर. कोणत्याही वाणिज्य बँकेला तिच्या एकूण ठेवींच्या प्रमाणात ठरावीक रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कडे बिनव्याजी स्वरूपात ठेवावी लागते, यालाच सीआरआर म्हणतात.
2/8

पूर्वी सीआरआरचे प्रमाण 4.5% होते, परंतु आता ते कमी करून 4% करण्यात आले आहे.
3/8

उदाहरणार्थ, जर बँकेच्या ठेवी 100 रुपये असतील, तर त्यातील 4.5 रुपये आधी आरबीआयकडे ठेवावे लागत होते, पण आता त्याऐवजी फक्त 4 रुपयेच ठेवावे लागतील.
4/8

सीआरआर घटल्यामुळे बँकांकडे अधिक निधी उपलब्ध होतो, जो ग्राहकांना कर्जाच्या स्वरूपात देता येतो.
5/8

थोडक्यात, सीआरआर कमी करून अर्थव्यवस्थेत अधिक पैसा उपलब्ध करून दिला जातो.
6/8

यामुळे नागरिकांच्या हाती अधिक पैसा येईल, जो खर्च आणि गुंतवणुकीसाठी वापरला जाईल.
7/8

सीआरआर 4% केल्यामुळे बँकिंग व्यवस्थेत तब्बल 1.16 लाख कोटी रुपये येणार आहेत.
8/8

जरी रेपो दरात बदल केलेला नसला, तरी बँकिंग व्यवस्थेत निधी "इंजेक्ट" करून आर्थिक वाढीस चालना देण्याचा सरकार आणि आरबीआयचा प्रयत्न आहे.
Published at : 06 Dec 2024 12:01 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















