एक्स्प्लोर
IPO Update :क्वाड्रंट फ्यूचर टेकचा आयपीओ लिस्ट होताच शेअर बनला रॉकेट, अप्पर सर्किट लागलं अन् गुंतवणूकदार मालामाल
Quadrant Future Tek IPO :क्वाड्रंट फ्यूचर टेक आयपीओचं बीएसई आणि एनएसईवर जोरदार लिस्टींग झालं. सध्या शेअरनं 400 रुपयांचा टप्पा पार केला आहे.
क्वाड्रंट फ्यूचर टेक आयपीओ
1/5

क्वाड्रंट फ्यूचर टेकचा आयपीओ शेअर बाजारात आज लिस्ट झाला. बीएसईवर 29 टक्के आणि एनएसईवर 28 टक्के प्रीमियमसह हा आयपीओ लिस्ट झाला. आयपीओ 370 रुपयांना लिस्ट झाला.
2/5

क्वाड्रंट फ्यूचर टेकचा आयपीओ ज्यांना अलॉट झाला होता त्यांना 80 रुपये लिस्टिंग गेन मिळाला आहे. आयपीओचा किंमतपट्टा 290 रुपये होता. आयपीओ लिस्ट झाल्यानंतर या शेअरची वाटचाल अप्पर सर्किटच्या दिशेनं सुरु झाली आहे.
3/5

सध्या क्वाड्रंट फ्यूचर टेकचा शेअर 444 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना जवळपास 50 टक्के फायदा झाला आहे. या शेअरला अप्पर सर्किट देखील लागलं आहे.
4/5

क्वाड्रंट फ्यूचर टेक लिमिटेडचा आयपीओ गुंतवणूकदारांकडून जवळपास 186 पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीनं 290 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ आणला होता. यापैकी 130 कोटींची रक्कम अँकर इन्वेस्टर्सनी गुंतवणूकीद्वारे जमा केली होती.
5/5

क्वाड्रंट फ्यूचर टेक लिमिटेडचा आयपीओ संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 132.54 पट, रिटेल गुंतवणूकदारांनी 243.12 पट आणि गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांनी 254.16 पट सबस्क्राइब केलं होतं. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 14 Jan 2025 11:22 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















