एक्स्प्लोर
Ganeshotsav 2025 : सरकारने नाकारली परवानगी म्हणून एकादशीला होते श्रींची स्थापना; माजलगावच्या टेंबे गणपतीची अनोखी परंपरा 125 वर्षानंतरही कायम
Ganeshotsav 2025 : तत्कालीन निझाम सरकारने परवानगी नाकारल्याने या गणपतीची स्थापना भाद्रपद एकादशीच्या दिवशी आणि विसर्जन पाच दिवसांनी पौर्णिमेला करण्यात येते.
Ganeshotsav 2025
1/6

नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या बीडच्या माजलगाव येथील निजामकालीन टेंबे गणपतीची स्थापना करण्यात आलीय.
2/6

तत्कालीन निझाम सरकारने परवानगी नाकारल्याने या गणपतीची स्थापना भाद्रपद एकादशीच्या दिवशी आणि विसर्जन पाच दिवसांनी पौर्णिमेला करण्यात येते.
3/6

यंदा या गणपतीचे 125 वे वर्ष आहे.काल एकादशीच्या दिवशी या गणपतीची मिरवणूक काढून स्थापना करण्यात आली.
4/6

तत्कालीन निझाम सरकारने या गणपती मिरवणुक अडवली होती,त्यामुळे सदस्यांनी मिरवणूक अडविलेल्या ठिकाणाहून घोड्यावर जात हैदराबादहून स्थापना करण्याची परवानगी आणली.
5/6

याच कारणामुळे पाच दिवस गणपती त्याच ठिकाणी थांबविण्यात आला होता. स्थापनेपासूनच या गणपतीची मूर्ती माती,शेण,चिखल,सारवणाच्या मिश्रणातून साकारली जाते.
6/6

एवढी वर्षे लोटली,काळ बदलला तरीदेखील इकोफ्रेंडली मूर्तीची परंपरा मंडळाने आजही टिकविलेली आहे.
Published at : 04 Sep 2025 09:27 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























