देशात गव्हाच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं गव्हाची कमतरता यावर्षी भासणार नसल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे.
2/9
यंदा गव्हाची कमतरता भासणार नसल्याचेही सांगण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून सध्या मोठ्या प्रमाणावर गव्हाची खरेदी सुरु आहे.
3/9
गव्हाच्या लागवडीत (Crop Cultivation) देखील वाढ झाली आहे. यंदा 286 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
4/9
देशातील दोन राज्यात गव्हाच्या लागवडीत घट झाली आहे. तर आठ राज्यात गव्हाच्या लागवडीत वाढ झाली आहे.
5/9
केंद्र सरकारनं दिलेल्या राज्यनिहाय आकडेवारीनुसार पेरणीची स्थिती पाहिली तर महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये यंदा गव्हाच्या लागवडीत घट झाली आहे.
6/9
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, पश्चिम बंगाल, झारखंड आणि कर्नाटकमध्ये गव्हाच्या पेरणी वाढ झाल्याची माहिती केंद्र सरकारनं दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. यंदा देशात गव्हाखालील लागवडीच्या क्षेत्रीत तीन टक्क्यांची वाढ झाली आहे.
7/9
गहू लागवडीचे क्षेत्र हे 286.5 लाख हेक्टर झाले आहे. गेल्या वर्षी यावेळेपर्यंत हे क्षेत्र 278.25 लाख हेक्टर होते.
8/9
केंद्र सरकारकडून देशातील गव्हाच्या लागवडी संदर्भातील माहिती सातत्यानं दिली जात आहे. यंदा गव्हाच्या पेरणीची स्थिती चांगली आहे. आतापासूनच केंद्राकडून साठेबाजीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
9/9
यावर्षी रब्बी पिकांच्या लागवडीत देखील मोठी वाढ झाली आहे. पिकांखालील एकूण क्षेत्राची स्थिती पाहिल्यास 552.28 लाख हेक्टरवरून रब्बी पिकांचे क्षेत्र हे 578.10 लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे.