भारतीय साखर क्षेत्रासाठी 2021-22 हे वर्ष अत्यंत समृद्ध ठरले आहे. कारण या हंगामात उसाच्या उत्पादनात (Sugarcane Production) मोठी वाढ झाली आहे.
2/9
साखरेचे उत्पादन, साखर निर्यात, ऊस खरेदी, उसाची देय रक्कम आणि इथेनॉल (Ethanol) उत्पादन या सर्वच क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित झाले आहेत.
3/9
साखर हंगाम 2021-22 मध्ये देशात 5000 लाख मेट्रिक टनापेक्षा (LMT) अधिक उसाचे उत्पादन झालं आहे.
4/9
साखर कारखान्यांनी त्यापैकी 574 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करुन सुमारे 394 लाख मेट्रिक टन साखर तयार केली आहे.
5/9
36 लाख मेट्रिक टन साखर, इथेनॉल उत्पादनासाठी वापरण्यात आली तर साखर कारखान्यांनी 359 लाख मेट्रिक टन साखर तयार केली आहे.
6/9
साखर हंगाम (ऑक्टोबर-सप्टेंबर) 2021-22 मध्ये भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक म्हणून उदयास आला आहे.
7/9
ब्राझीलनंतर साखरेचा जगातील दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश झाला आहे. साखरेचे भाव घसरल्याने साखर कारखानदारांना होणारे रोखीचे नुकसान टाळण्यासाठी, केंद्र सरकारने 2018 मध्ये साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) निश्चित करण्याची संकल्पना मांडली होती
8/9
साखर हंगाम 2021-22 मध्ये साखर कारखान्यांनी केंद्र सरकारकडून कोणतेही आर्थिक अनुदान न घेता 1.18 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा ऊस खरेदी केला होता.
9/9
साखर क्षेत्राला स्वयंपूर्ण करण्यासाठीची दीर्घकालीन उपाययोजना म्हणून केंद्र सरकार साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन देत आहे.