एक्स्प्लोर
बापरे! शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली होतोय 'ही' फसवणूक, जाणून घ्या काय कळाजी घ्यावी?
Kisan Samman Nidhi : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या मदतीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांना वर्षाला हजार रुपये दिले जाते.

pantpradhan shetkari samman nidhi yojana cyber fraud (फोटो सौजन्य- फ्रिपिक)
1/7

PM Kisan Scheme : केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. प्रत्येक चार महिन्यांनी तीन हफ्त्यांत ही रक्कम दिली जाते. मात्र या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत.
2/7

गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमावर पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाील एक एपीके लिंक व्हायरल होत आहे. या लिंकवर क्लीक केल्यावर शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही लिकंवर क्लीक करू नये, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
3/7

हा एका प्रकारची सायबर फसवणूक आहे. तुम्ही या लिंकवर क्लीक केल्यानंतर मोबाईल फोनमध्ये एक अॅप्लिकेशन डाऊनलोड होते. त्यानंतर शेतकऱ्यांचा मोबाईल आणि सीमकार्ड हॅक होते. मोबाईल आणि सीमकार्डचा कंट्रोल घेतला जातो. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.
4/7

शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही लिंकवर क्लीक कर नये. अन्यथा शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड भरावा लागू शकतो.
5/7

वर नमूद केलेल्या पद्धतीने सायबर फ्रॉड, फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांनी लगेच 1930 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करावा. तसेच cybercrime.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तक्रार दाखल करावी.
6/7

तुम्हाला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधई योजनेचा फायदा घ्याचा असेल तर https://pmkisan.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच गुगल प्ले स्टोअरवरजाऊनही तुम्ही या योजनचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.
7/7

image 7
Published at : 21 Jul 2024 09:41 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
अहमदनगर
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
