एक्स्प्लोर
Tomato : दिल्लीत प्रतिकिलो टोमॅटोसाठी 200 रुपये
दिल्लीत (Delhi) सध्या टोमॅटोची 'लाली' अधिक वाढल्याचं चित्र दिसत आहे. प्रतिकिलो टोमॅटोसाठी 200 रुपयांचा दर आहे.
Tomato Price
1/9

सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. मागणी वाढून पुरवठा कमी झाल्यामुळं दरात मोठी वाढ होत आहे.
2/9

देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) सध्या टोमॅटोची 'लाली' अधिक वाढल्याचं चित्र दिसत आहे. प्रतिकिलो टोमॅटोसाठी 200 रुपये द्यावे लागत आहेत.
3/9

दिल्लीतील मदर डेअरीने सफाल रिटेल आउटलेटवर टोमॅटोची 259 रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली.
4/9

प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळं पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळं टोमॅटोचे भाव एक महिन्याहून अधिक काळ झालं वाढले आहेत.
5/9

सध्या देशभरात टोमॅटो दरात मोठी वाढ झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी टोमॅटो आहे, त्यांना मोठा फायदा होत आहे.
6/9

सध्या ज्या प्रमाणात टोमॅटोला मागणी आहे ,या प्रमाणात पुरवठा होताना दिसत नाही. परिणामी टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. प्रतिकिलो टोमॅटोसाठी 170 ते 200 रुपये द्यावे लागत आहेत.
7/9

राष्ट्रीय राजधानीतील किरकोळ किंमती अलीकडेच खाली येऊ लागल्या होत्या. परंतू कमी पुरवठ्यामुळे पुन्हा टोमॅटोच्या किंमती वाढल्या आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, टोमॅटोची किरकोळ किंमत बुधवारी 203 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली
8/9

गेल्या दोन महिन्यांपासून खराब हवामानामुळं टोमॅटोच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असल्याची माहिती मदर डेअरीच्या प्रवक्त्याने दिली आहे.
9/9

गेल्या दोन दिवसांत आझादपूर मंडईत टोमॅटोची आवक लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. त्यामुळं घाऊक दरात मोठी वाढ झाली आहे.
Published at : 03 Aug 2023 12:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion