एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कमळ पहिल्या क्रमांकावर, भाजपचा दावा, तर आदित्य म्हणतात...
भाजपचा गड असलेल्या नागपुरमध्ये भाजपला जोरदार धक्का बसला आहे. सहा जिल्हा परिषदेपैकी धुळे वगळता कुठेही भाजपला स्पष्ट बहुमत असल्याचे दिसत नाही. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या नव्या फॉर्म्युल्यानुसार सत्ता येण्याची शक्यता अधिक आहे.
मुंबई : राज्यात बुधवारी निकाल जाहीर झालेल्या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत एकूण 332 जागांपैकी 106 जागा जिंकून भारतीय जनता पार्टी पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असल्याचा दावा भाजप महाराष्ट्रने ट्वीट करत केला आहे. सोबतच या निवडणुकीतील सर्व विजयी उमेदवारांचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन देखील केले आहे. तर आज महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागले. आज पुन्हा महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला आणि महाराष्ट्र विकास आघाडीला कल दिला आहे. मी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो आणि सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
जिल्हा परिषदांसोबतच पंचायत समित्यांच्या निवडणुकीत एकूण 664 जागांपैकी 194 जागा जिंकून तेथेही भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. राज्याच्या कोकण, उत्तर महाराष्ट्र व विदर्भ या तीन विभागातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणूक निकालात भाजपाने आपली आघाडी राखली आहे, असा दावा भाजपने केला आहे. भाजपला सर्वाधिक 106 जागा मिळाल्या तर काँग्रेस ( एकूण 70 जागा), राष्ट्रवादी काँग्रेस (46) व शिवसेना (49) हे अन्य पक्ष जिंकलेल्या जागांच्या बाबतीत भाजपपेक्षा बरेच मागे राहिले. पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 194 जागा मिळाल्या असताना काँग्रेस (145 जागा), शिवसेना (117) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (80) हे पक्ष भाजपापेक्षा संख्याबळाच्या बाबतीत मागे राहिले आहे, असे देखील भाजपने म्हटले आहे.
भाजपाने धुळे जिल्हा परिषदेत 56 पैकी 39 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेत 56 पैकी 26 जागा जिंकून भाजपा पहिल्या स्थानावर आहे. या सहा जिल्हा परिषदांमध्ये भाजपाच्या सदस्यांच्या संख्येत मोठी वाढ होऊन आता ही संख्या 106 झाली आहे. धुळे जिल्हा परिषदेत 13 वरून 39 तर नंदूरबार जिल्हा परिषदेत 1 वरून 26 सदस्य संख्या गाठली आहे. असं असलं तरी भाजपचा गड असलेल्या नागपुरमध्ये भाजपला जोरदार धक्का बसला आहे. सहा जिल्हा परिषदेपैकी धुळे वगळता कुठेही भाजपला स्पष्ट बहुमत असल्याचे दिसत नाही. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या नव्या फॉर्म्युल्यानुसार सत्ता येण्याची शक्यता अधिक आहे. संबंधित बातम्या Akola ZP Election Result : अकोला जिल्हा परिषदेत वंचित सर्वात मोठा पक्ष, सत्ता वंचितकडे राहण्याची शक्यता शिवसेनेच्या दोन नाराज आमदारांकडून जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचाच पराभव? Palghar ZP Result | पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेचं वर्चस्व तर भाजपला मोठा दणका Dhule ZP Election Result : धुळे जिल्हा परिषदेवर प्रथमच भाजपची एकहाती सत्ता Nagpur ZP Electon Result : निवडणुकीत भाजपची धूळदाण, होमग्राऊंडवरच देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का Nandurbar ZP Election | नंदुरबार जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती, काँग्रेस-भाजपला प्रत्येकी 23जागा, शिवसेनेच्या हाती सत्तेची चावीनिवडणूक आयोगाकडून आताच प्राप्त आकडेवारीनुसार जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा हा 106 जागा जिंकून क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. pic.twitter.com/Va0CPBLtMJ
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 8, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
क्रीडा
क्राईम
Advertisement